Riteish Deshmukh : रितेशच्या आयुष्यातील 'ती' सगळ्यात मोठी चूक, म्हणाला, "मला भुवया येणंच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:40 PM2023-04-24T12:40:32+5:302023-04-24T12:41:46+5:30

रितेशने जे केलं ते आठवून आजही त्याला अंगावर काटा येतो.

riteish deshmukh shared biggest mistake in his life says he did eyebrows and waxing | Riteish Deshmukh : रितेशच्या आयुष्यातील 'ती' सगळ्यात मोठी चूक, म्हणाला, "मला भुवया येणंच..."

Riteish Deshmukh : रितेशच्या आयुष्यातील 'ती' सगळ्यात मोठी चूक, म्हणाला, "मला भुवया येणंच..."

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या अभिनयातून मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत छाप पाडली. नुकताच त्याचा आणि जिनिलियाचा 'वेड' हा मराठी सिनेमा तुफान हिट झाला. सिनेमाने ७० कोटींचा गल्ला जमवत मराठी सिनेसृ्ष्टीत इतिहास रचला. नुकतंच रितेश आणि जिनिलिया या जोडीने करिना कपूरच्या (Kareena Kapoor) 'व्हॉट वुमन वॉंट' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी रितेशने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती ते सांगितलं आहे. ते ऐकून हसावं की रडावं हेच तुम्हाला कळणार नाही.

'अपना सपना मनी मनी' या सिनेमात रितेशने स्त्री पात्र साकारलं होतं. याविषयी करिनाने प्रश्न विचारला असता रितेश म्हणाला,'2006 साली जेव्हा मी अपना सपना मनी मनी मध्ये काम करत होतो तेव्हा कोणीही कलाकार स्क्रीनवर महिलेची भूमिका करत नव्हता.त्यामुळे ते माझ्यासाठी खरोखरंच आव्हानात्मक होतं. मग मी विचार केला आणि मी वॅक्सिंग करायला गेलो. ते करताना मी इतका ओरडलो आणि इतकंच नाही तर मी थ्रेडिंग सुद्धा केलं. तेव्हा मी आयब्रोज केले आणि नंतर मला आयब्रोच्या इथं केस येणंच बंद झालं होतं. ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.'

रितेशने सांगितलेला हा किस्सा ऐकताच जिनिलिया आणि करिनालाही खूप हसू येतं. मात्र रितेशने जे केलं ते आठवून आजही त्याला अंगावर काटा येतो. सध्या रितेश जिनिलिया आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या वेड सिनेमाची दखल देशभरात घेतली गेली आहे. हिंदीतही हा सिनेमा डब करण्यात आला आहे.

Web Title: riteish deshmukh shared biggest mistake in his life says he did eyebrows and waxing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.