कोरोना काळात उदरनिर्वाहासाठी वृद्धेची कसरत, रितेश देशमुखने व्हिडिओ शेअर करत म्हटलं 'वॉरिअर' आजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 12:07 PM2020-07-24T12:07:55+5:302020-07-24T12:08:20+5:30

"रितेश देशमुखने इन्स्टाग्राम अकाउंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे."

Riteish Deshmukh shared a video saying 'Warrior' Aji | कोरोना काळात उदरनिर्वाहासाठी वृद्धेची कसरत, रितेश देशमुखने व्हिडिओ शेअर करत म्हटलं 'वॉरिअर' आजी

कोरोना काळात उदरनिर्वाहासाठी वृद्धेची कसरत, रितेश देशमुखने व्हिडिओ शेअर करत म्हटलं 'वॉरिअर' आजी

googlenewsNext



 

कोरोना काळात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे अनेक जणांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली. अशातच पोटापाण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या आजींचा व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखने देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.


रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की वॉरिअर आजी.  या व्हिडिओत आजी लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपले कौशल्य सादर करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Warrior Aaji

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on


लॉकडाउनमुळे अनेक जणांच्या उदरनिर्वाहाचाी समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी आपल्या गावाची वाट धरली. याच काळात अभिनेता सोनू सूद अनेकांच्या मदतीसाठी धावला.


राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. राज्याचे प्रमाण ५५.९ तर देशाचे ६३.१८ टक्के आहे. देशात ७ लाख ८२ हजार रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत, तर राज्यात एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गुरुवारी दिवसभरात ६ हजार ४८४ रुग्ण बरे झाल. राज्यात कोविडमुक्त होत असलेल्या रुग्णांची संख्या आता दोन लाखांच्या उंबरठ्यावर आहे.


राज्यात सध्या १ लाख ४० हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात ९ हजार ८९५ रुग्ण व २९८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ झाली आहे, तर बळींचा आकडा १२ हजार ८५४ झाला आहे. राज्याचा मृत्यूदर ३.७ टक्के आहे.

Web Title: Riteish Deshmukh shared a video saying 'Warrior' Aji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.