Ved Marathi Movie : मी पालीला घाबरत नाही पण...रितेश देशमुखने सांगितला जिनीलियाचा लग्नाअगोदरचा तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:32 PM2023-01-04T17:32:52+5:302023-01-04T17:33:34+5:30
रितेश आणि जिनिलिया या दोघांच्या आयुष्यातील किस्से एक से एक आहेत. आताही रितेशने सांगितलेला जिनिलियाचा किस्सा ऐकून पोट धरुन हसाल हे नक्की
Ved Marathi Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख(Genelia Dsouza-Deshmukh)चा वेड मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनसाठी रितेश जिनिलिया अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. त्यात दोघांचेही अगदी भन्नाट किस्से आहेत जे पोट धरुन हसायला लावणारे आहेत. असाच एक पालीचा किस्सा रितेशने भाडिपाच्या (Bhadipa) मुलाखतीत सांगितला आहे.
आणि जिनिलियाने पालीशी गप्पा मारल्या
जिनिलियाच्या पालीचिया किस्स्याबद्दल सांगताना रितेश म्हणतो, 'आम्ही long distance रिलेशनशिपमध्ये होतो. एक दिवसही सुट्टी मिळाली की जिनिलिया मुंबईत भेटायला यायची. तर एक दिवस जिनिलियाचे शूट एका गावात सुरु होते. पॅकअप झालं की आम्ही फोनवर बोलत होतो, नेहमीच्या गप्पा सुरु होत्या कसं चाललंय काय चाललंय आणि मध्येच जिनिलिया म्हणते, थांब हं, नाही नाही नाही जवळ येऊ नको, तिथेच थांब. जिनिलिया घाबरली आहे हे कळल्यावर मी विचारलं काय झालं ठीक आहेस ना तरी तिचं तेच सुरु. मग कळलं की ही पालीशी बोलत होती.'
हा किस्सा सांगित्यावर रितेश असंही म्हणतो, मी पालीला घाबरत नाही, पण बायकोला...आणि सगळे जण हसायला लागतात.
Tujhe Meri Kasam : रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम', ना ओटीटीवर, ना टीव्हीवर; काय आहे यामागे कारण ?
३० डिसेबर रोजी वर्षाच्या शेवटी सिनेमा प्रदर्शित झाल्यानं सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल झाले. पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार ओपनिंग करत, महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचवं स्थान मिळवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.50 कोटींची कमाई केली होती. नव्या वर्षात वेड हा सिनेमा आणखी कमाई करेल यात काही शंका नाही.