न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:10 AM2024-07-03T09:10:45+5:302024-07-03T09:20:27+5:30

रितेश देशमुखच्या लाडक्या बायकोनं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  

riteish deshmukh wife Genelia Deshmukh Barefoot Walk On New York Street Actress Shared Video | न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय जिनिलीया देशमुख, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची सून, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी तसेच दाक्षिणात्य,  हिंदीसह मराठी  मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशी जिनिलिया देशमुखची (Genelia Deshmukh) ओळख आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर नेहमीच ते अभिनेता रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता नुकतेच रितेशच्या लाडक्या बायकोनं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  

महाराष्ट्राची लाडकी वहिणी जिनिलिया देशमुख नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. जिनिलिया सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. जिनिलिया न्यूयॉर्क रस्त्यावर अनवाणी फिरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. तिचा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 'न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतेय… आणि का नको फिरू यातच आनंद आहे' असं कॅप्शन जिनिलीयाने दिलं आहे. 

जिनिलियाचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलीयाने तिच्या गुलाबी रंगाच्या हिल्स हातात घेतल्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिने या व्हिडीओला 'हसते हसते कट जाए रस्ते' हे गाणं जोडलं आहे. यावेळी जिनिलाय ही ब्लॅक कॅज्युअल ऑऊटफीटमध्ये सुंदर दिसत होती. 

जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आमिर खानच्या 'सितारें जमीन पर' या चित्रपटात झळकणार आहे. राहिल आणि रियान या दोन मुलांच्या जन्मानंतर जिनिलिया काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होती. पण, तिने थेट रितेशसोबत 'वेड' (Ved) या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा कमबॅक केलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. 

Web Title: riteish deshmukh wife Genelia Deshmukh Barefoot Walk On New York Street Actress Shared Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.