Ved : ‘वेड लावलंय’वर रितेश भाऊनी अख्ख्या बॉलिवूडला नाचवलं..., पाहा व्हिडीओ...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 11:26 AM2022-12-26T11:26:57+5:302022-12-26T11:27:41+5:30

Ved Lavlay Marathi song : विकी कौशल, अनिल कपूर, अभिषेक बच्चन, अनन्या पांडे... रितेश भाऊच्या गाण्यानं अख्ख्या बॉलिवूडला वेड लावलंय...

Riteish Deshmukh wild dance with Vicky Kaushal on ved lavlay song Ved marathi movie | Ved : ‘वेड लावलंय’वर रितेश भाऊनी अख्ख्या बॉलिवूडला नाचवलं..., पाहा व्हिडीओ...!!

Ved : ‘वेड लावलंय’वर रितेश भाऊनी अख्ख्या बॉलिवूडला नाचवलं..., पाहा व्हिडीओ...!!

googlenewsNext

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा सर्वांचा लाडका अभिनेता. 2002 पासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या रितेशने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लवकरच रितेश दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करतोय. होय, त्याने दिग्दर्शित केलेला आणि त्याची मुख्ख भूमिका असलेला ‘वेड’  ( Ved ) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रिलीजआधीच ‘वेड’ने चाहत्यांना जणू वेड लावलं आहे. चित्रपटाच्या गाण्यांनीही धुमाकूळ घातला आहे. अगदी इंडस्ट्रीतल्या अनेकांना ‘वेड’च्या गाण्यांनी थिरकायला भाग पाडलं आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. विकी कौशल अगदी बेभान होऊन ‘वेड’च्या गाण्यावर थिरकतोय.

‘चला जरा वेड लाऊया’ म्हणत विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. रितेशनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यात विकी व रितेश ‘वेड लावलंय’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. विकी रितेशच्या गाण्यातील हुक स्टेप्स फॉलो करताना व्हिडीओत दिसतोय. (Salman Khan, Riteish Deshmukh Ved Lavlay Marathi song )

याआधी  ‘वेड’च्या ‘वेड लावलंय’ या गाण्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी थिरकताना दिसलेत. अभिषेक बच्चन नुकताच या गाण्यावर थिरकताना दिसला.

अनन्या पांडेही या गाण्यावर थिरकताना दिसली. 

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अगदी करण जोहरही रितेशच्या या गाण्यावर थिरकताना दिसला.

अनिल कपूरही ‘वेड लावलंय’ गाण्यावर झक्कास डान्स करताना दिसले. एकंदर काय तर रितेश भाऊच्या गाण्यानं अख्ख्या बॉलिवूडला वेड लावलंय.

 रितेश देखमुख आणि जिनिलीया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला  ‘वेड’ हा मराठी सिनेमा येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या चित्रपटाचं  ‘वेड लावलंय’ गाणं रिलीज झालं.  या गाण्यात रितेश आहे आणि सोबत भाईजान सलमानही आहे. ‘वेड लावलंय’ हे गाणं अजय गोगावणे आणि प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी गायलं आहे. या गाण्यातील सलमान आणि रितेशची केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांना वेड लावत आहे.  रितेश आणि सलमानची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.
 
 

Web Title: Riteish Deshmukh wild dance with Vicky Kaushal on ved lavlay song Ved marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.