'दिग्दर्शकासोबत शरीरसंबंध..'; 'रॉकी और राणी' फेम अभिनेत्रीला आला बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 03:25 PM2023-08-06T15:25:37+5:302023-08-06T15:26:09+5:30
Anjali anand: 'तू कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही' असं तिला सांगण्यात आलं होतं.
सध्याच्या काळात व्यक्तीच्या रंगरुपाला, त्याच्या दिसण्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं. त्यामुळे कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना वर्णभेद, बॉडी शेमिंगसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. यातील काही अभिनेत्रींनी त्यांना आलेला अनुभव चाहत्यांसोबत उघडपणे शेअर केला. आहे. यामघ्येच सध्या रॉकी औऱ राणी की प्रेम कहानी या सिनेमातील अभिनेत्री अंजली आनंद हिने तिला आलेल्या बॉडीशेमिंगच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.
अंजली आनंद हिने रॉकी और राणी की प्रेमकहानी या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमातील तिची भूमिका सध्या चांगलीच गाजत आहे. मात्र, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला बराच स्ट्रगल करावा लागला. इतकंच नाही तर तिच्या शरीरयष्टीवरुन तिला अनेकांनी तिला ट्रोलही केलं. तू जाड आहेस, तुला अभिनय क्षेत्रात काम करता येणार नाही, असं म्हणत बऱ्याचदा तिला नकार देण्यात आला. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने भाष्य केल आहे.
"पूर्वी जाड लोकांना सिनेमा किंवा मालिकेमध्ये फक्त खाण्याची भूमिका द्यायचे. एक जाड मुलगी फ्रेंच फ्राईज किंवा बर्गर खातीये असंच दाखवलं जायचं. पण, बदलत्या काळानुसार आता लोकांनाही त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता जाड माणसाला केवळ खाण्यापुरतंच दाखवू नये", असं ती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "१० वर्षांपूर्वी मी एका अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी तू अभिनेत्री होऊ शकत नाही असं मला सांगण्यात आलं होतं. पण, मी प्रयत्न करत राहिले. मला एका मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तेव्हा जाड असूनही हिला मुख्य भूमिका कशी मिळाली अशी चर्चा रंगली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकांनी मला ट्रोल केलं आहे. ‘जाड मुलीला कोण काम देतं, दिग्दर्शकासोबत शरीर संबंध ठेवले असतील.. असं लोक म्हणतात. मला कळत नाही लोक इतका वाईट विचार कसा करु शकतात? ‘ ‘फक्त लठ्ठ आहे म्हणून मुलगी पुढे जाऊ शकत नाही का? लोकांची अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे."
दरम्यान, रॉकी और राणी की प्रेमकहाणीपूर्वी अंजलीने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अंजलीचा सोशल मीडियावरही चांगला वावर आहे.