रोहित शेट्टी बनवू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोपिक, कुणाची लागणार वर्णी??
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 09:30 PM2018-09-23T21:30:35+5:302018-09-23T21:32:15+5:30
बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शित रोहित शेट्टी हा खरे तर त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण आता रोहित शेट्टीला एक बायोपिक खुणावू लागले आहे.
बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शित रोहित शेट्टी हा खरे तर त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण आता रोहित शेट्टीला एक बायोपिक खुणावू लागले आहे. होय, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याची महत्त्वाकांक्षा रोहितने बोलून दाखवली आहे. अलीकडे एका मुलाखतीत तो बोलत होता. संधी मिळाली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोपिक बनवणे मला आवडेल. मी शिवाजी महाराजांबद्दल सगळे जाणून आहो. मी त्यांच्यावर एक उत्तम चित्रपट बनवू शकतो, अशी खात्री मला आहे, असे रोहित म्हणाला.
विशेष म्हणजे, रोहितने शिवाजी महाराजांवरील बायोपिकचा उल्लेख केला आणि यात कुणाची वर्णी लागेल, याची चर्चा सुरु झाली. होय, रोहित शेट्टीने हे बायोपिक बनवलेच तर यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याबद्दल अनेक तर्क बांधले जात आहेत. यासाठी सर्वप्रथम अजय देवगणचे नाव घेतले जात आहे. अजय व रोहितची मैत्री बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. रोहितच्या अनेक चित्रपटात अजय दिसला आहे. त्यामुळे रोहितच्या या बायोपिकसाठी सर्वांच्या डोक्यात सर्वप्रथम अजयचे नाव येत आहे. दुस-या क्रमांकावर रणवीर सिंगचे नाव आहे. रणवीर सिंगही रोहितची पसंत ठरू शकते, असेही मानले जात आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात रणवीरने मराठी योद्धा बाजीरावची भूमिका साकारली होती. त्यामुळे रोहित शेट्टी जेव्हाकेव्हा शिवाजी महाराजांचे बायोपिक बनवेल तेव्हा यातील मुख्य भूमिकेसाठी अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या चुरस पाहायला मिळेल, असे मानले जात आहे. आता या दोघांपैकी कोण बाजी मारतो की रोहित दुसºयाच कुणाला पसंती देतो, ते बघूच.
तूर्तास रोहित शेट्टी ‘सिम्बा’ या चित्रपटात बिझी आहे़ यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे.