तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 06:00 AM2019-02-02T06:00:00+5:302019-02-02T06:00:02+5:30
रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ हा चित्रपट रिलीज झाला आणि रोहितच्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली. ‘सिम्बा’ नंतर लगेच रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटासाठी त्याने प्रथमच अक्षय कुमारसोबत हातमिळवणी केली. तूर्तास रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे.
Rohit Shetty clarifies: News that Rohit Shetty has bought rights of a #Tamil film for #Sooryavanshi is untrue and baseless... Akshay Kumar starrer #Sooryavanshi, produced and directed by Rohit Shetty, is an original story and not inspired from any film, the statement reads.
— taran adarsh (@taran_adarsh) February 1, 2019
ताज्या चर्चेनुसार, ‘सिम्बा’प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा आगामी चित्रपटही एका साऊथच्या सिनेमाचा रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा आहे. ही बातमी आली आणि अनेकांचा चटकन विश्वास बसला. कारण रोहितने याआधीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवले आहेत. पण रोहितने स्वत: ही बातमी ऐकली तेव्हा तो रागाने लाल झाला. त्यामुळेच ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने सांगून टाकले.
तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता. त्यामुळे ‘सूर्यवंशी’ हे टायटल आधीच रजिस्टर होते. रोहित शेट्टीलाही ‘सूर्यवंशी’ नावानेच चित्रपट बनवायचा आहे म्हटल्यावर हे टायटल मिळवण्यासाठी त्याला अनेकांच्या मानमिनत्या कराव्या लागल्या. अखेर बोनी कपूरच्या मदतीने त्याने निर्माता विजय गिलानी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवले आणि ‘सूर्यवंशी’चा मार्ग मोकळा झाला. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीत उतरतो, ते बघूच.