रोहित शेट्टी ठरला यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश डिरेक्टर; शिल्पा शेट्टी म्हणते- 'दरवर्षी सुपरहिटचा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:55 AM2021-12-04T10:55:23+5:302021-12-04T10:56:06+5:30

लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात रोहित शेट्टीला मोस्ट स्टायलिश डिरेक्टरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Rohit Shetty named this year's Lokmat Most Stylish Director; Shilpa Shetty says- 'Every year a super hit ...' | रोहित शेट्टी ठरला यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश डिरेक्टर; शिल्पा शेट्टी म्हणते- 'दरवर्षी सुपरहिटचा...'

रोहित शेट्टी ठरला यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश डिरेक्टर; शिल्पा शेट्टी म्हणते- 'दरवर्षी सुपरहिटचा...'

googlenewsNext

नुकताच मुंबईत लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीला मोस्ट स्टायलिश डिरेक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी त्याने ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मात्र शिल्पा शेट्टीने या फोटोवर केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रोहित शेट्टी यंदाचा लोकमत मोस्ट स्टायलिश डिरेक्टर ठरला आहे. त्याने या ट्रॉफीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटले की, बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळो ना मिळो.. मोस्ट स्टायलिश डिरेक्टरचा अवॉर्ड तर दरवर्षी मिळून जातो. लोकमतचा मी आभारी आहे.

रोहित शेट्टीच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीदेखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र या पोस्टवरील अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कमेंटनेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने लिहिले की, दरवर्षी सुपरहिटचा रिवॉर्डदेखील पण तर मिळतो प्रेक्षकांकडून रोहित शेट्टी. तसेच या पुरस्कार सोहळ्यात शिल्पा शेट्टीला देखील मोस्ट स्टायलिश फॅशन आयकॉनचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी तिने आपल्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 

Web Title: Rohit Shetty named this year's Lokmat Most Stylish Director; Shilpa Shetty says- 'Every year a super hit ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.