Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 09:46 AM2024-07-24T09:46:54+5:302024-07-24T09:47:21+5:30

'गोलमाल ५' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Rohit Shetty REVEALS plans for Golmaal 5 Ajay Devgn, Arshad Warsi, Tusshar Kapoor, Shreyas Talpade | Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट

Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट

कॉमेडी चित्रपट 'गोलमाल'चं (Golmaal) नाव देखील ऐकलं तरी हसू आवरत नाही. गोलमाल चित्रपटाच्या सिक्वेलनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आतापर्यत या चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर प्रेक्षक आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच रोहित शेट्टीनं (Rohit Shetty) चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी माहिती दिली आहे.   

रोहित शेट्टीने 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत गोलमालच्या सिक्वेलबाबत खुलासा केला आहे. रोहित शेट्टी म्हणाला, 'अजून वेळ आहे. गोलमालचे सिक्वेल येत राहणार आहेत. चित्रपट बनणार नाही असे होणार नाही. पण थोडा वेळ लागेल. गोलमाल असो किंवा कॉप युनिव्हर्स ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे'. 

खरंतर, रोहित शेट्टीने देखील त्याच्या चाहत्यांना वचन दिले होते, की तो लवकरच 'गोलमाल-५' घेऊन परतेल, जो २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलमाल रिटर्न्सचा सिक्वेल असेल. चित्रपटात रोहित शेट्टीसह अजय देवगण, अर्शद वारसी, करिना कपूर आणि तुषार कपूर होते. 

रोहित शेट्टीच्या गोलमाल पहिला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात शर्मन जोशी, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. यानंतर रोहित शेट्टीने 'गोलमाल रिटर्न्स', 'गोलमाल ३' 'गोलमाल अगेन' असे चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. आता केवळ चाहतेच नाही तर चित्रपटातील सर्व कलाकार देखील अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत.
 

Web Title: Rohit Shetty REVEALS plans for Golmaal 5 Ajay Devgn, Arshad Warsi, Tusshar Kapoor, Shreyas Talpade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.