'बिट्टी बिझनेसवाली' या मालिकेत प्रकृती मिश्रा साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 11:26 AM2018-05-14T11:26:44+5:302018-05-14T16:56:44+5:30

प्रियांका चोप्राने एकदा मुलाखतीमध्ये म्हटले होते, ''आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे सर्वात महत्त्वाचे आहे. माझी आई नेहमी म्हणायची की स्त्री आर्थिकदृष्ट्या ...

The role played by Prakash Mishra in 'Bitti Businesswali' series | 'बिट्टी बिझनेसवाली' या मालिकेत प्रकृती मिश्रा साकारणार ही भूमिका

'बिट्टी बिझनेसवाली' या मालिकेत प्रकृती मिश्रा साकारणार ही भूमिका

googlenewsNext
रियांका चोप्राने एकदा मुलाखतीमध्ये म्हटले होते, ''आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे सर्वात महत्त्वाचे आहे. माझी आई नेहमी म्हणायची की स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यास ती स्वत:च्या इच्छेनुसार जगू शकते.'' स्त्रियांचे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे हा विषय आता जगभरात चर्चिला जात आहे आणि याच चर्चेला समोर आणत आहे &TV वरील आगामी मालिका 'बिट्टी बिझनेसवाली'. राकेश पासवान यांच्या व्हिलेज बॉय प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेमधील बिट्टीचा प्रेरणादायी प्रवास आपल्या समाजातील महत्त्वपूर्ण प्रश्नाला समोर आणेल, तो म्हणजे सुखवस्तू कुटुंबातील मुलगी अथवा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे का महत्त्वाचे आहे? 
१६ मे २०१८ पासून दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेमधील बिट्टी या स्वतंत्र व्यक्तिमत्त्त्व असलेल्या नायिकेची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रकृती मिश्राने साकारली आहे. ही अभिनेत्री आपल्या उत्साहापूर्ण अभिनयासह प्रेक्षकांना मालिकेकडे आकर्षून घेईल. तिच्यासेाबत या मालिकेमध्ये असणार आहे लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता अभिषेक बजाज. बिट्टीच्या आयुष्यातील देखणा आणि तिला नेहमीच साह्य करणारा नायक 'माही'ची भूमिका तो साकारणार आहे. सिटी ऑफ गॉड्स म्हणजेच अलाहाबादची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी पहिले पाऊल उचलणाऱ्या बिट्टीचा स्वत:साठी आणि तिच्या कुटुंबासाठी सन्मान 'प्राप्त' करण्याचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. स्वतंत्र विचारसरणी असलेल्या तरुण बिट्टीचा संघर्ष यात आहे. बिट्टी सर्व पारंपारिक रुढींना झुगारुन पुरुषप्रधान समाजामध्ये आपला उद्योग सुरू करणार आहे. अद्वितीय आणि व्यावहारिक उपाय शोधून काढण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये बिट्टी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याच्या हेतूसह एक पानाचे दुकान सुरू करण्याचा विचार करते. बिट्टीचा दृष्टिकोन आणि विचारांचे माहीला कौतुक आहे. माही या तरुणाची तत्त्वे आणि मूल्ये त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या अगदी विरुद्ध आहेत. बिट्टीची भूमिका साकारण्याबाबत प्रकृती मिश्रा सांगते, ''बिट्टीची भूमिका अत्यंत खास आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्यासोबतच कुटुंबाला मदत करण्यावर तिचा भर आहे. वैयक्तिक आयुष्यात देखील माझ्या पालकांची देखील इच्छा आहे की, मी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, स्वत: निर्णय घेण्यात मी सक्षम असायला हवे आणि माझ्या इच्छांना मीच पूर्ण केले पाहिजे. मालिकेमध्ये माझी वास्तविक जीवनातील भूमिकाच मी साकारत आहे. पण ही मालिका स्वीकारण्यासाठी मला प्रेरित केले ते एका प्रश्नाने जो मी एकदा ऐकला होता... तो म्हणजे गृहिणी दिवसभर अथक मेहनत करतात, त्यांच्या पतीच्या उच्चभ्रू रोजगारप्रमाणेच काम करत आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजांची पूर्तता करतात, मग त्या त्यांच्या पतीप्रमाणे स्वावलंबी का नाहीत? हा अत्यंत विवादात्मक विषय असला तरी अनेकजणांना याचे सकारात्मक उत्तर मिळाले नाही. पण मी आशा करते की बिट्टीच्या भूमिकेतून आम्ही आत्मसन्मान प्राप्त करण्याच्या या चर्चेला समोर आणण्यामध्ये यशस्वी होऊ. मी स्वत: विविध क्षेत्रांमध्ये उच्च स्थानावर असलेल्या अनेक महिलांकडून प्रेरणा घेते. कारण या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यामुळेच त्यांना सन्मान मिळतोय.'' 

Web Title: The role played by Prakash Mishra in 'Bitti Businesswali' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.