स्वरा भास्कर पहिल्यांदाच दिसणार ह्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 06:00 AM2018-12-09T06:00:00+5:302018-12-09T06:00:00+5:30

स्वरा भास्कर लवकरच फ्लेश या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

In the role of Swara Bhaskar for the first time to appear | स्वरा भास्कर पहिल्यांदाच दिसणार ह्या भूमिकेत

स्वरा भास्कर पहिल्यांदाच दिसणार ह्या भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे'फ्लेश' वेबसीरिजची कथा मानवी तस्करीवर आधारीतस्वरा दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत 'फ्लेश'च्या चित्रीकरणाला सुरूवात

अभिनेत्री स्वरा भास्करने रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. आता ती हातात बंदुक व खाकी वर्दी परिधान करून पोलिसाच्या वेशात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र ती या अंदाजात चित्रपटात नाही तर वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजचे नाव 'फ्लेश' असे आहे.

'फ्लेश' वेबसीरिजची कथा मानवी तस्करीवर आधारीत असून ही कथा पूजा लाढा सुरतीच्या लेखणीतून साकार झाली आहे. सिद्धार्थ आनंद या वेबसीरिजची निर्मिती करत असून इरॉस नाऊवर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी पूजा लाढा सुरतीने एक हसीना थी, बदलापूर व अंधाधुन यासारख्या सिनेमांच्या कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून साकार झालेली पात्र पूर्ण नसतात व आदर्श व्यक्तीदेखील नसतात. ही त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन दानिश आलम करणार आहे. 
या वेबसीरिजबद्दल स्वरा म्हणाली की, 'प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की धाडसी, बिंधास्त व प्रभावशाली भूमिका साकारायला मिळाव्यात. फ्लेश वेबसीरिजचा एक भाग झाल्यामुळे मी खूश आहे आणि इतक्या टॅलेंटेड टीममुळे मी उत्साहीत आहे. करियरमध्ये पहिल्यांदाच पोलीस अधिकारीची भूमिका बजावणार आहे आणि माझ्या चाहत्यांना माझा अंदाज नक्कीच भावेल. '
'फ्लेश' वेबसीरिजमध्ये स्वरा व्यतिरिक्त अक्षय ओबेरॉय, निद्या मलवाडे, केविन धवे आणि युधिष्ठिर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'फ्लेश'च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून पुढील वर्षी पहिल्या तीन महिन्यात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वरा भास्करचा दबंग अवतार पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: In the role of Swara Bhaskar for the first time to appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.