अमोल साकारणार योद्ध्याची भूमिका

By Admin | Published: March 21, 2016 01:50 AM2016-03-21T01:50:56+5:302016-03-21T01:50:56+5:30

रमा-माधव, नीळकंठ मास्तर यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभली आहे. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Role of a warrior who can play Amol | अमोल साकारणार योद्ध्याची भूमिका

अमोल साकारणार योद्ध्याची भूमिका

googlenewsNext

रमा-माधव, नीळकंठ मास्तर यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभली आहे. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘कृष्णाजी-एक योद्धा’ या योद्ध्याचा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटात कृष्णाजी या महान व कर्तृत्ववान व्यक्तिरेखेचं शिवधनुष्य अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी पेललं आहे. तसेच, हा चित्रपट अनंत सामंत यांच्या ‘लिलियनची बखर’ या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर करणार आहेत. इंग्रज व मराठे यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळेल.

Web Title: Role of a warrior who can play Amol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.