फॅक्टरीत काम करुन अभिनेत्याने फेडलेलं आईचं २५ हजारांचं कर्ज, आज आहे मोठा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 08:20 AM2024-10-25T08:20:15+5:302024-10-25T08:20:15+5:30

आईचं २५ हजारांचं कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्याने केलेलं फॅक्टरीत काम. आज करोडोंची संपत्ती

rolex fame suriya shivakumar work in factory for 25 thousand loan kanguva release | फॅक्टरीत काम करुन अभिनेत्याने फेडलेलं आईचं २५ हजारांचं कर्ज, आज आहे मोठा सुपरस्टार

फॅक्टरीत काम करुन अभिनेत्याने फेडलेलं आईचं २५ हजारांचं कर्ज, आज आहे मोठा सुपरस्टार

आज अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. परंतु  सुरुवातीला या कलाकारांनी प्रचंड संघर्षाचा काळ बघितलाय. कुठे नोकरी करुन, कुठे रस्त्यांवर वस्तू विकून या कलाकारांनी सुरुवातीचा स्ट्रगलचा काळ बघितलाय. आज जरी हे कलाकार सुपरस्टार होऊन करोडोंची संपत्ती कमावत असले तरीही जुन्या काळाला हे कलाकार विसरले नाहीत. आज अशाच एका अभिनेत्याची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. या अभिनेत्याचं नाव सूर्या. 

सूर्याने केलंय फॅक्टरीत काम

सूर्याने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. सूर्याचे वडील शिवकुमार हे सुद्धा प्रसिद्ध अभिनेते होते. परंतु ते कधीही कामाचे पैसे मागायचे नाहीत. निर्माते जोवर स्वतःहून विचारत नाहीत तोवर सूर्याचे वडील कामाचा मोबदला घ्यायचे नाहीत. परिणामी वडील प्रसिद्ध अभिनेते असूनही सूर्याच्या कुटुंबाची बचत अशी झाली नाही. एक दिवस सूर्याला आईकडून कळलं की,  तिने २५ हजारांची उधारी घेतलीय. ती उधारी फेडायला तिच्याकडे आता पैसे नाहीत. 

तेव्हा सूर्याने फॅक्टरीत काम केलं. फॅक्टरीत काम करणारा प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे हे कोणालाच माहित नव्हतं. परंतु तरीही सूर्या महिना ७५० रुपये पगारावर फॅक्टरीत काम करत राहिला. तब्बल तीन वर्ष सूर्याने फॅक्टरीत काम करुन कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. सूर्याने जेव्हा फॅक्टरी सोडली तेव्हा त्याचं मासिक वेतन ८ हजार रुपये होतं. सूर्याचे वडील तेव्हा हयात नव्हते. त्यामुळे आईने घेतलेली उधारी फेडण्यासाठी सूर्याने सुरुवातीच्या काळात असं काम  केलं. आज जरी सूर्याची संपत्ती करोडोंच्या घरात असली तरीही सुरुवातीचे हे दिवस तो विसरला नाही. सूर्याचा 'कंगुवा' सिनेमा १४ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे.

 

Web Title: rolex fame suriya shivakumar work in factory for 25 thousand loan kanguva release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.