रोमॅण्टिक सॉँग संगे ‘व्हॅलेंटाइन डे’

By Admin | Published: February 8, 2017 03:47 AM2017-02-08T03:47:09+5:302017-02-08T03:47:09+5:30

नात्याला अंकुर फुटण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते, मग ते कोणतेही नाते असो. नाते फुलण्यासाठी सामंजस्य, सहनशीलता आणि प्रेमाची आवश्यकता असते

Romantic Song Song 'Valentine's Day' | रोमॅण्टिक सॉँग संगे ‘व्हॅलेंटाइन डे’

रोमॅण्टिक सॉँग संगे ‘व्हॅलेंटाइन डे’

googlenewsNext

- सतिश डोंगरे

नात्याला अंकुर फुटण्यासाठी वातावरण अनुकूल असावे लागते, मग ते कोणतेही नाते असो. नाते फुलण्यासाठी सामंजस्य, सहनशीलता आणि प्रेमाची आवश्यकता असते. यातील एक जरी कमी असेल तरी तिथे नात्याला फारशी किंमत उरत नाही. याच विचाराने तरुणाई ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून परफेक्ट प्लॅनिंग करीत असते. मग त्यासाठी आपल्या प्रेमळ साथीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी ही मंडळी वेगवेगळे फंडे वापरतात. अर्थात यातील सर्वाधिक प्रभावी फंडा म्हणजे ‘बॉलिवूडचा आधार’ होय. मग, प्रपोज करण्यापासून ते रोमॅण्टिक गाण्यांपर्यंतचा विचार या मंडळींकडून केला जातो. बॉलिवूडमध्ये बरीच गाणी आहेत, जे प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम ठरत आले आहेत. असाच तुमचा रोमॅण्टिक अंदाजात प्रेम व्यक्त करण्याचा विचार असेल तर हे गाणे तुम्हाला मदतशीर ठरू शकतात. या गाण्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत एक अविस्मरणीय आठवण ठेवू शकता.


बाहों के दरमियां...
सलमान खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘खामोशी’ या सिनेमातील ‘बाहोंं के दरमियां’ हे गीत मनाला स्पर्श करून जाते. ‘खामोशी’ असे नाव असलेल्या या सिनेमातील या गाण्याचे बोल म्हणजे काही न बोलताच प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. या गाण्यातील बोल कानावर पडताच तुम्हाला रोमॅण्टिकनेसचा अनुभव आला नाही तरच नवल. त्यामुळे हे गीतदेखील ‘व्हॅलेंटाइन डे’साठी एक चांगले माध्यम ठरू शकेल.


चांद ने कुछ कहा...
बॉलिवूडचा रोमॅण्टिक किंग शाहरुख खान याचे बरीच गाणी अशी आहेत, जी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत ऐकू शकता. त्यातीलच एक प्रभावी गाणं म्हणजे ‘चांद ने कुछ कहा’ हे होय. ‘दिल तो पागल है’ या सिनेमातील अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबरोबरचे हे गीत प्रेम व्यक्त करण्यासाठीचे उत्तम माध्यम आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून तुम्ही हे गीत गाऊन अथवा ऐकून तुमचा ‘व्हॅलेंटाइन डे’ अधिक स्पेशल करू शकता.


चुरा लिया हैं तुमने...
‘जुनं ते सोनं’ असतं असं म्हणतात. झीनत अमानच्या ‘यादों की बारात’ या सिनेमातील ‘चुरा लिया हैं तुमने’ या गाण्यावरून तरी या म्हणीचा अर्थ स्पष्ट होतो. कारण आजही हे गीत मनाला स्पर्श करून जाते. कारण गाण्यातील शब्द कानावर पडताच एका वेगळ्याच दुनियेत आपण हरवून जातो. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेसाठी हे गाणे प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम ठरू शकते. हे गीत तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनबरोबर ऐकून चांगल्या आठवणींचा ठेवा करू शकता.

दो दिल मिल रहे है...
व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून जर तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाइनला प्रपोज करू इच्छित असाल तर त्यासाठी हे गाणं उत्तम ठरू शकते. ‘परदेस’ या सिनेमातील हे गीत प्रेम व्यक्त करण्यासाठी समजले जाते. शाहरुख खान आणि महिमा चौधरी यांच्यावर चित्रित केलेल्या या गाण्याचे बोल मनाला स्पर्श करून जातात. त्यामुळे या व्हॅलेंटाइनला हे गाणे तुम्हाला तुमच्या प्रे्रयसीला प्रपोज करण्यासाठी उत्तम ठरू शकते.

दिल तो पागल हैं...
रोमॅण्टिक सिनेमा ‘दिल तो पागल हैं’चे हे टायटल सॉँग तुमचा हा ‘व्हॅलेंटाइन डे’ अधिक स्मरणीय करू शकेल. शाहरुख, माधुरी आणि करिष्मा यांच्यावर चित्रित केले गेलेले हे गाणे त्या वेळी तरुणाईला खूपच भावले होते. सिनेमाप्रमाणेच टायटल सॉँगही जबरदस्त हिट झाले होते. आजही या गाण्याचे बोल कानावर पडताच मनाला सुखद धक्का बसतो. त्यामुळे येत्या व्हॅलेंटाइनला हे गाणं तुमच्या व्हॅलेंटाइनबरोबर एक चांगली आठवण ठरू शकते.

Web Title: Romantic Song Song 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.