रोनित रॉयने पत्नीसोबत दिल्या रोमॅन्टिक पोझ, पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:48 PM2021-11-11T12:48:54+5:302021-11-11T12:52:13+5:30
Ronit Roy : आज रोनितची पत्नी नीलम सिंग (Neelam Singh) हिचा वाढदिवस. अशात रोनितने पत्नीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील मिस्टर बजाज या भूमिकेने रोनित रॉय (Ronit Roy) घराघरात पोहचला. या मालिकेने रोनित रॉयच्या करियरला एक वेगळी दिशा दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आज रोनित छोट्या पडद्यावरचा सर्वात यशस्वी आणि सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता आहे. आज रोनितची पत्नी नीलम सिंग (Neelam Singh) हिचा वाढदिवस. अशात रोनितने पत्नीला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्नीसोबतचे काही रोमॅन्टिक फोटो रोनितने शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत रोनित व नीलम एकमेकांना किस करताना दिसत आहेत. दुस-या फोटोत रोनित पत्नीच्या हाताचे चुंबन घेताना दिसतोय तर तिस-या फोटोत दोघंही रोमॅन्टिक पोझ देत आहेत. फोटोत दोघंही मॅचिंग कलरच्या आऊटफिटमध्ये आहेत.
रोनितला सुरूवातीपासूनच अभिनय करायचा होता. रोनित मुंबईला आला, त्यावेळी त्याच्या खिशात केवळ सहा रुपये होते. दिग्दर्शक सुभाष घई यांना रोनित ओळखत असल्याने त्यांच्याकडे रोनितला राहाण्याची परवानगी मिळाली. पण सुभाष घई यांच्याकडे रोनित राहात असला तरी त्याला अभिनयक्षेत्रात कोणतीही संधी मिळत नव्हती. अखेरीस कंटाळून त्याने एका हॉटेलमध्ये नोकरी करण्याचे ठरवले. हॉटेलमध्ये टेबल साफ करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत सगळी कामे रोनितला करावी लागत होती.
रोनित नोकरी करत असतानाच त्याला ‘जान तेरे नाम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने सैनिक, हलचल, आर्मी यांसारख्या चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. अभिनयक्षेत्रात आपले करियर होऊ शकत नाही असे रोनितला वाटू लागल्याने तो सिक्युरीटी एजेन्सीच्या व्यवसायाकडे वळला. पण अचानक एकता कपूरने त्याला ‘कसौटी जिंदगी’ या मालिकेत काम करायची संधी दिली. खरे तर या मालिकेतील मिस्टर बजाज ही त्याची भूमिका केवळ आठ आठवड्यांची असणार असे ठरले होते. पण रोनित रॉयने त्याच्या दमदार अभिनयाने ही भूमिका खूपच चांगल्याप्रकारे सादर केली.अल्पावधीतच या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यामुळे या कार्यक्रमाची निमार्ती एकता कपूरने मिस्टर बजाज ही भूमिका मालिकेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेनंतर रोनितने कधीच मागे वळून पाहिले नाही.