काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 03:42 PM2022-03-25T15:42:52+5:302022-03-25T15:43:04+5:30

RRR Box Office Collection : सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासातच RRR ने नवा इतिहास रचला आहे आणि नवे रेकॉर्ड्सही बनवायला सुरूवात केली आहे.

RRR become first Indian film to earn Rs 22 crore from US premiere shows | काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा

काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा

googlenewsNext

RRR Box Office Collection :  एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाने रिलीज होताच धुमाकूळ घालता आहे. हा सिनेमा बघण्यासाठी फॅन्स कधीपासूनचे आतुर होते. आता हा सिनेमा रिलीज झाला तर फॅन्समध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे.  RRR ची जादू केवळ भारतातच नाही तर परदेशातही बघायला मिळत आहे. लोक या सिनेमासाठी इतके उत्सुक आहेत की, रिलीजच्या काही तासातच यूएसमध्ये RRR ने २२ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासातच RRR ने नवा इतिहास रचला आहे आणि नवे रेकॉर्ड्सही बनवायला सुरूवात केली आहे. ३०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या सिनेमाचा यूएस प्रिमिअर शोज बघण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अशात अशी माहिती समोर येत आहे की, यूएस प्रिमिअर शोजमधून RRR ने ३ मिलियन डॉलर्स म्हणजे २२ कोटी रूपयांची कमाई केली आहे. फक्त प्रिमिअरला इतकी कमाई करणारा यूएसमधील हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.

रफ्तार क्रिएशनने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, 'RRR सिनेमाचा यूएस प्रिमिअर. ९८१ लोकेशनवर सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत १२७ डॉलर्सची कमाई झाली आहे. आपल्या प्रिमिअरवर ३ मिलियन डॉलर्स कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे'.

सोशल मीडियावरून RRR सिनेमाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. एसएस राजामौली, रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआर यांच्या दमदार कामाचंही कौतुक केलं जात आहे. यात दोन क्रांतिकारकांची कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: RRR become first Indian film to earn Rs 22 crore from US premiere shows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.