RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 03:33 PM2022-03-26T15:33:26+5:302022-03-26T15:37:24+5:30

राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे.

RRR Box Office Collections Day 1: RRR first day collection worldwide around 223 cr breaks all records | RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही

RRR Box Office Collections Day 1: राजामौलीच्या RRR चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमाई इतकी की विश्वास बसणार नाही

googlenewsNext

बॉक्स ऑफिसवर एस एस राजामौली यांच्या RRR सिनेमाची सुरूवात तूफान झाली आहे. RRR च्या पहिल्या दिवसाच्या कमाईने प्रेक्षकांना हैराण केलं आहे. रामचरण, ज्यूनिअर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या या सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली आहे. राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे.

तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, सिनेमाने आंध्र प्रदेशात ७५ कोटी रूपये, निझाममध्ये २७.५ कोटी रूपये, कर्नाटकात १४.५ कोटी रूपये, तामिळनाडूमध्ये १० कोटी रूपये, केरळमध्ये ४ कोटी रूपये आणि नॉर्थ इंडियात २५ कोटी रूपये कमाई केली. तर यूएसमध्ये या सिनेमाने ४२ कोटी रूपयांची कमाई केली तसेच इतर देशांमध्ये २५ कोटी रूपयांची कमाई केली. अशाप्रकारे या सिनेमाने एकूण २२३ कोटी रूपयांची कमाई केली.

एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाचं प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही भरभरून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर लोक हा सिनेमा मास्टरपिस असल्याचं बोलत आहेत. रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआरच्या कामाचंही खूप कौतुक केलं जात आहे. अशात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपल्या कमाईची घौडदोड अशी सुरू ठेवणार असं चित्र दिसत आहे.
 

Web Title: RRR Box Office Collections Day 1: RRR first day collection worldwide around 223 cr breaks all records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.