RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 07:08 PM2022-10-06T19:08:10+5:302022-10-06T19:09:49+5:30

RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

RRR for Oscar: RRR in 'Oscars' race, Producers filed nominations in 15 categories | RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

googlenewsNext

RRR for Oscar: 'बाहुबली' (Bahubali) आणि 'आरआरआर' (RRR) सारखे मोठे चित्रपट बनवल्यानंतर एसएस राजामौली (SS Rajmouli) हे भारतातील सर्वात मोठे दिग्दर्शक बनले आहेत. दरम्यान, भारताने ऑस्करसाठी RRRची निवड न केल्यामुळे चाहते नाराज झाले होते. पण, आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) अभिनित RRR ऑस्करच्या (Oscar Awards) शर्यतीत सामील झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांच्या चित्रपटाने 15 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन दाखल केले आहे.

या श्रेणींमध्ये नामांकन दाखल

  1. बेस्ट मोशन पिक्चर
  2. बेस्ट डायरेक्टर
  3. बेस्ट अॅक्टर
  4. बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
  5. बेस्ट ओरिजिनल सॉन्ग
  6. बेस्ट ओरिजिनल स्कोर
  7. बेस्ट फिल्म एडिटिंग
  8. बेस्ट साउंड
  9. बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले
  10. बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस
  11. बेस्ट सिनेमाटोग्राफी
  12. बेस्ट प्रोडक्शन डिझाइन
  13. बेस्ट कास्ट्यूम डिझाइन
  14. बेस्ट हेअरस्टाइलिंग
  15. बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स

RRR चे निर्माते काय म्हणाले?
एक निवेदन जारी करत RRRचे निर्माते म्हणाले की, RRR ने भारतीय चित्रपटाला संपूर्ण जगासमोर माइलस्टोनचा दर्जा मिळवून दिला, यामुळे आम्ही खूप खूश आहोत. चित्रपटाने भाषेची सीमा ओलांडून जगभरातील खूप चांगली कमाई केली. RRRला प्रेम देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आम्ही चित्रपटाला ऑस्कर अवार्ड्स (The Academy for Oscars) मध्ये जनरल कॅटेगरीसाठी पाठवत आहोत.

भारताने अधिकृतरित्या केली नाही निवड
या वर्षी गुजराती चित्रपट "छेल्लो शो"ला भारताकडून अधिकृतरित्या 95व्या अकादमी पुरस्कारांसाठी पाठवण्यात आले आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने याची घोषणा केली. चित्रपटाला इंग्रजीत "लास्ट फिल्म शो" असे नाव आहे. पान नलिनच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट येत्या 14 ऑक्टोबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. दरम्यान, The Kashmir Files किंवा RRR ला ऑस्करमध्ये न पाठवल्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी FFIवर खूप टीका केली होती.

Web Title: RRR for Oscar: RRR in 'Oscars' race, Producers filed nominations in 15 categories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.