आता हे काय? ‘रानबाजार’नंतर प्राजक्ता माळीच्या ‘या’ फोटोची रंगली चर्चा, चाहत्यांनी अशा दिल्या कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:15 AM2022-05-20T10:15:57+5:302022-05-20T10:19:56+5:30
Prajakta Mali : ‘रानबाजार’ची चर्चा सुरू असताना आता प्राजक्ता माळीचा आणखी नवा फोटो समोर आला आहे आणि तो पाहून आता हे काय? असा प्रश्न चाहत्यांनी केला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ (RaanBaazaar ) ही मराठी वेबविश्वाला हादरवणारी नवी मराठी वेबसीरिज आज ‘प्लॅनेट मराठी’वर स्ट्रिम होतेय. नुकताच या वेबसिरीरीजचा टीझर आणि ट्रेलर रिलीज झाला. तो पाहून प्रेक्षकांना मोठा ‘हादरा’ बसला. विशेषत: टीझरमधील प्राजक्ता माळीचा कधी नव्हे इतका बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. तुला हे शोभत नाही, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा काय काय प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. ‘रानबाजार’ची चर्चा सुरू असताना आता प्राजक्ता माळीचा आणखी एक नवा फोटो समोर आला आहे आणि तो पाहून चाहत्यांना आणखी एक ‘हादरा’ बसला आहे. हे नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी केला आहे.
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने प्राजक्तासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. दोघींचा ‘रिस्पेक्ट’ ( Respect) नावाचा सिनेमा येतोय. या सिनेमाचीच फोटोरूपी झलक ऋतुजाने शेअर केली आहे. हे फोटो पाहता आणखी एका बोल्ड कथानकाची चर्चा सुरु झालीये. कथा नेमकी काय आहे, हे अद्याप कळलेलं नाही. पण या फोटोवरून अंदाज बांधत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘हे आणखी काय?’, असा सवाल एका युजरने हा फोटो पाहून केला आहे. ‘हे चाललंय तरी काय?’, असं एकाने म्हटलं आहे. ‘नजर में कुछ काला है,’ अशी प्रतिक्रिया अन्य एका युजरने हा फोटो पाहून दिली आहे. ‘नवीन प्रेम’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘असलं कर्त्यास व्हय,’ अशी कमेंटही एका युजरने केली आहे. काहींनी हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील म्हटलं आहे.
‘रिस्पेक्ट’ हा सिनेमा येत्या 22 मे रोजी झी 5 आणि झी टॉकिजवर रिलीज होतोय. या चित्रपटात रेवती, इरा, सुहास, प्रिया, ईश्वरी, चांदबी आणि तारा अशा सहा स्त्रीयांची गोष्ट वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून मांडली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे या चित्रपटातून पर्दापण करतेय. किशोर बेळेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.