OMG! केवळ हिरोंच्या एन्ट्री सीनवर राजमौलींनी खर्च केलेत इतके कोटी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:51 AM2019-07-10T11:51:00+5:302019-07-10T11:51:57+5:30
‘बाहुबली’ सीरिजमुळे देशातील प्रत्येक सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘आरआरआर’ हिरोंच्या एन्ट्री सीनवर सर्वाधिक खर्च करणारा सिनेमा ठरला आहे.
‘बाहुबली’ सीरिजमुळे देशातील प्रत्येक सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट हे सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘आरआरआर’ हिरोंच्या एन्ट्री सीनवर सर्वाधिक खर्च करणारा सिनेमा ठरला आहे.
R... R... R... 💥🤘🏻
— RRR Movie (@RRRMovie) March 14, 2019
30th July 2020... #RRR#RRRPressMeet@tarak9999#RamCharan@aliaa08@ajaydevgn@thondankani@dvvmovies@RRRMoviepic.twitter.com/mK81sXRq5n
होय, आधी राम चरणच्या एन्ट्री सीनवर राजमौलीने 15 कोटी रूपये खर्च केलेत. यानंतर ज्युनिअर एनटीआरच्या एन्ट्री सीनसाठी राजमौलीच्या टीमने 25 कोटींचा बजेट फायनल केला आहे. दोन सीनसाठीचा हा बजेट 40 कोटींच्या घरात आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात केवळ दोन सीनवर 40 कोटी खर्च करणारा कदाचित हा पहिला चित्रपट आहे. खरे तर इतक्या बजेटमध्ये दोन चांगले चित्रपट बनू शकले असते. पण राजमौलींना कुठलीही तडजोड मान्य नाही. दोन्ही हिरोंची एन्ट्री शानदार, दमदार व्हावी, अशी त्यांची इच्छा होती आणि त्याचमुळे या एन्ट्री सीनवर त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.
One of the first film in India to be Shot on Arri #AlexaLF and Arri #SignaturePrime Lens.@ARRIChannel@RRRMovie.
— KK Senthil Kumar (@DOPSenthilKumar) January 21, 2019
Starting our 2nd Schedule Today.@DVVMovies@tarak9999@ssrajamouli#RamCharanpic.twitter.com/0JVUWbhbuG
तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण १० भाषांत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. पुढील वर्षी30 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘बाहुबली’ सीरिजनंतर ‘आरआरआर’ हा राजमौलींचा पहिला चित्रपट आहे. बाहुबली व बाहुबली 2 या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली होती. आता ‘आरआरआर’ हा बिग बजेट सिनेमा किती कमाई करतो ते बघूच.
Cameras have started rolling on @ssrajamouli's latest epic, #RRR. https://t.co/krUAENLIYm
— Twitter Moments India (@MomentsIndia) November 19, 2018