बिनधास्त भीडूचे बिनधास्त किस्से...! अन् पहिल्याच दिवशी सेटवर हाफ पँट घालून पोहोचले जॅकी श्रॉफ

By रूपाली मुधोळकर | Published: October 8, 2020 08:00 AM2020-10-08T08:00:00+5:302020-10-08T08:00:02+5:30

‘हिरो’च्या सेटवरचा पहिल्या दिवशीची किस्सा ...

sa re ga ma pa little champs jackie shroff remember an incident during film hero | बिनधास्त भीडूचे बिनधास्त किस्से...! अन् पहिल्याच दिवशी सेटवर हाफ पँट घालून पोहोचले जॅकी श्रॉफ

बिनधास्त भीडूचे बिनधास्त किस्से...! अन् पहिल्याच दिवशी सेटवर हाफ पँट घालून पोहोचले जॅकी श्रॉफ

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सारेगामापा लिटिल चँप्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या फिनालेमध्ये गोविंदा, शक्ती कपूर व जॅकी श्रॉफ गेस्ट म्हणून सहभागी झालेत. यावेळी खुद्द जॅकी यांनी ‘हिरो’च्या सेटवरचा पहिल्या दिवशीचा किस्सा ऐकवला.

बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात एक-दोन नाही तर अनेक मोठ्या स्टार्सचा बोलबाला होता. याच काळात मुंबईच्या चाळीतला एक छोकरा बॉलिवूडमध्ये आला आणि बघता बघता यशाच्या शिखरावर पोहोचला. स्वत:च्या करिअरलाच नाही तर भारतीय सिनेमालाही त्याने एक नव्या उंचीवर नेले. मुंबईच्या चाळीतला हा छोकरा कोण तर जॅकी श्रॉफ.जॅकी श्रॉफने देव आनंद यांच्या 1982 मध्ये प्रदर्शित ‘स्वामी दादा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख दिली ती सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाने. या एका चित्रपटाने जॅकी दादा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. एका रात्रीत सुपरस्टार झाला. ‘हिरो’च्या सेटवरचा पहिल्या दिवशीची किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का?
‘सारेगामापा लिटिल चँप्स’ या रिअ‍ॅलिटी शोच्या फिनालेमध्ये गोविंदा, शक्ती कपूर व जॅकी श्रॉफ गेस्ट म्हणून सहभागी झालेत. यावेळी खुद्द जॅकी यांनी ‘हिरो’च्या सेटवरचा पहिल्या दिवशीचा किस्सा ऐकवला.

सुभाष घई यांनी मला ‘हिरो’ बनवले...
करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना आठवत त्यांनी सांगितले, ‘सुभाष घई माझे दुसरे कुटुंब आहे. माझ्या लग्नात माझ्या पत्नीचे कन्यादान सुभाष घई यांनीच केले होते. मी त्यांना माझे गुरु, भाऊ, प्रशिक्षक सगळे काही मानतो. देव साहेबांनी मला इंडस्ट्रीत आणले हे खरे आहे. पण मला ‘हिरो’ बनवले ते सुभाष घई यांनी. स्वामी दादा या सिनेमात मी विलेन बनून पडद्यावर झळकलो होतो. पण सुभाष घई यांनी मला हिरो बनवले.’

 मला कोलांटउड्या मारायला सांगितल्या... 

 ‘हिरो’ या सिनेमात संधी कशी मिळाली? डिशन वा लूक टेस्ट असे काही झाले होते का? या प्रश्नाचे उत्तर देताना जॅकी यांनी हैराण करणारी माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘हिरो’साठी माझे कुठलेही ऑडिशन वा स्क्रिन टेस्ट झाली नव्हती. फक्त त्यांनी मला जमिनीवर कोलांटउड्या मारायला सांगितल्या होत्या. मी किती कोलांटउड्या मारल्या मला माहित नाही. त्यावेळी मला ते जरा विचित्र वाटले होते. पण हा माझ्या फाईटींग ट्रेनिंगचा एक भाग असल्याचे मला कळले होते.

हाफ पँट अन् बनियानवर पोहाचले जॅकी दा...
एक इंटरेस्टिंग किस्सा त्यांनी ऐकवला. त्यांनी सांगितले, ‘हिरो’चे शूटींग सुरू झाले आणि मी पहिल्यादिवशी सेटवर पोहोचलो. मला शोबाजी जमत नाही. त्यामुळे हाफ पँट आणि बनियान अशा वेषात मी सेटवर
पोहोचलो. मला पाहून सुभाष घईला हसावे की रडावे ते कळेना. ते मला लगेच बाजूच्या खोलीत घेऊन गेलेत आणि मला पटापट कुर्ता पायजामा घालायला लावला. यानंतर सेटवर संजीव कुमार, शम्मी अंकल, वीरूजींशी त्यांनी माझी भेट करून दिली.

जॅकी श्रॉफची लेक कृष्णा दिसली बॉयफ्रेंडसोबत धमालमस्ती करताना, पहा तिचे हे फोटो

अन् कतरिना कैफच्या नादात जॅकी श्रॉफ झाले बर्बाद, बंगला ठेवावा लागला गहाण!

Web Title: sa re ga ma pa little champs jackie shroff remember an incident during film hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.