सबसे कातिल गौतमी पाटीलनं साधला टीकाकारांवर निशाणा, म्हणाली - 'जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:10 PM2023-03-10T12:10:09+5:302023-03-10T12:10:59+5:30

Gautami Patil : महिला दिनाच्या निमित्ताने गौतमी पाटील हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Sabse Katil Gautami Patil targeted the critics, said - 'Those who do not call me good...' | सबसे कातिल गौतमी पाटीलनं साधला टीकाकारांवर निशाणा, म्हणाली - 'जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना...'

सबसे कातिल गौतमी पाटीलनं साधला टीकाकारांवर निशाणा, म्हणाली - 'जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना...'

googlenewsNext

आपल्या कातिल अदां आणि नृत्य कौशल्याने कमी कालावधीत गौतमी पाटील (Gautami Patil ) प्रसिद्धीझोतात आली. तिच्या लावणी कार्यक्रमाला लोक प्रचंड गर्दी करत असतात. इतकेच नाही तर सोशल मीडियावरही तिचा फॅन फॉलोव्हिंगही प्रचंड आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. ती सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या अश्लील डान्स स्टेपमुळे तर कधी विधानांमुळे. तिने या सगळ्या प्रकारांसाठी बऱ्याचदा माफीदेखील मागितली आहे. मात्र तरीदेखील तिच्यावर टीका होताना दिसते. दरम्यान  महिला दिनाच्या निमित्ताने गौतमी पाटील हिचा सत्कार करण्यात आला यावेळी तिने जी भूमिका मांडली त्यावरुन तिच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर गौतमीचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिने टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

गौतमी पाटील म्हणाली की, मी स्वतःला लावणी नृत्यांगना म्हणून कधीही गवगवा केलेला नाही. माझ्या कार्यक्रमामध्ये अनेकांना अश्लीलता दिसते, ते मला त्यावरुन बोलतात, यासगळ्या प्रकारावर मी कित्येकदा माफीदेखील मागितली आहे. पण आता काहीजण ऐकत नसतील तर त्यांना मी काय म्हणू.

ती पुढे म्हणाली की, मला जे चांगले म्हणतात त्यांना धन्यवाद देते. जे नाही म्हणत त्यांना बाय बाय करते. लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महिला दिनाच्या निमित्ताने जो माझा गौरव केला जातो त्याबद्दल मी आभारी आहे. महिलांचे प्रेम मला मिळते आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत.
 

Web Title: Sabse Katil Gautami Patil targeted the critics, said - 'Those who do not call me good...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.