‘कर्णसंगिनी’मध्ये हा अभिनेता दिसणार कृष्णाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 09:00 PM2018-11-12T21:00:00+5:302018-11-12T21:00:02+5:30

‘कर्णसंगिनी’ या मालिकेतही सचिन श्रॉफ कृष्णाची भूमिका रंगविणार आहे. ही भूमिका साकारण्यासंदर्भात सचिन श्रॉफने एका टॅब्लॉईडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

sachin shroff will essay Krishna role in Karn Sangini | ‘कर्णसंगिनी’मध्ये हा अभिनेता दिसणार कृष्णाच्या भूमिकेत

‘कर्णसंगिनी’मध्ये हा अभिनेता दिसणार कृष्णाच्या भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्देया मालिकेत माझी कृष्णाची भूमिका आधीच्यापेक्षा किती वेगळी असेल, हे मी आत्ताच सांगू शकणार नाही; कारण मी चित्रीकरणाला अजून प्रारंभ केलेला नाही असे सचिन सांगतो.एक अभिनेता म्हणून मला जी भूमिका पटते आणि जी भूमिका मी स्वीकारली आहे, ती साकारणं हे मी माझं काम आहे.अशा भूमिकांमुळे पौराणिक मालिकांमधील कलाकार असा ठसा माझ्यावर बसेल, याची भीती मला वाटत नाही.

बालकृष्ण  या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका रंगविल्यावर आता ‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेतही सचिन श्रॉफ कृष्णाची भूमिका रंगविणार आहे. ही भूमिका साकारण्यासंदर्भात सचिन श्रॉफने एका टॅब्लॉईडला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने या मुलाखतीत म्हटले आहे की, “मी खूप सुदैवी आहे, असं मला वाटतं. कृष्णाची ही भूमिका साकारण्यासाठी स्वत: भगवान कृष्णानेच माझी निवड केली असावी. या मालिकेत माझी कृष्णाची भूमिका आधीच्यापेक्षा किती वेगळी असेल, हे मी आत्ताच सांगू शकणार नाही; कारण मी चित्रीकरणाला अजून प्रारंभ केलेला नाही.”

यापूर्वी देखील तीन मालिकांमध्ये सचिन श्रॉफने पौराणिक व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. पुन्हा त्याच प्रकारची तो भूमिका साकारत आहे. याविषयी तो सांगतो,  “पौराणिक मालिकांमध्ये भूमिका रंगविण्यास मला काहीच अडचण वाटत नाही. मी कोणत्याही भूमिकेला अशा वर्गवारीत बसवू इच्छित नाही; कारण एक अभिनेता म्हणून मला जी भूमिका पटते आणि जी भूमिका मी स्वीकारली आहे, ती साकारणं हे मी माझं काम आहे, असं समजतो. शिवाय आपला धर्म आणि पौराणिक गोष्टींबाबत आपल्याला अशा मालिकांमधून अधिक माहिती मिळते. पौराणिक मालिकांमधून भूमिका साकारण्यात मी व्यग्र असल्याने मला समकालीन मालिकांमध्ये भूमिका साकारता येत नाहीयेत. पण त्यामुळे माझं काही अडत आहे, असं नाही. प्रत्येक मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेची विशिष्ट आणि स्वतंत्र चौकट असते. व्यक्तिरेखेचा गाभा कायम ठेवतानाच मी ती काहीशा वेगळ्या पद्धतीने साकार करण्याचा प्रयत्न करीत असतो, त्यामुळे ती नवी वाटते. अशा भूमिकांमुळे पौराणिक मालिकांमधील कलाकार असा ठसा माझ्यावर बसेल, याची भीती मला वाटत नाही. कारण मी अनेक जाहिरातींमध्ये काम करत असून अन्य मालिकांमध्ये देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका रंगवीत आहे.”

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत.
ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.30 वाजता ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळत आहे. 

Web Title: sachin shroff will essay Krishna role in Karn Sangini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.