Salman Khanच्या बॉडी डबलचा मृत्यू, जिममध्ये वर्क आउटदरम्यान आला हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 08:06 PM2022-09-30T20:06:54+5:302022-09-30T20:07:55+5:30

Salman khan Body Double : सलमान खानचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या सागर 'सलमान' पांडे यांचे निधन झाले आहे.

Sagar AKA Salman Pande | Salman Khan's body double dies of a heart attack during a workout at the gym | Salman Khanच्या बॉडी डबलचा मृत्यू, जिममध्ये वर्क आउटदरम्यान आला हार्ट अटॅक

Salman Khanच्या बॉडी डबलचा मृत्यू, जिममध्ये वर्क आउटदरम्यान आला हार्ट अटॅक

googlenewsNext

Salman khan Duplicate :सलमान खानचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या सागर 'सलमान' पांडेचे निधन झाले आहे. ही घटना आज (30 सप्टेंबर) दुपारी 1.00 वाजताच्या सुमारास घडली. जिममध्ये वर्कआउट करत असताना सलमान पांडेला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 50 वर्षीय सागर 'सलमान' पांडे ट्रेड मिलमध्ये धावत असताना अटॅक आला.

सागरने बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो आणि टीव्ही शो बिग बॉस यांसारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सलमान खानचा बॉडी डबल म्हणून काम केले होते. काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील जिममधील ट्रेड मिलमध्ये व्यायाम करताना असाच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सुमारे 40 दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

सागरला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले
सागर सलमानचा डुप्लिकेट म्हणून खूप प्रसिद्ध होता आणि तो अनेकदा देशभरातच नव्हे तर परदेशातही स्टेज शो करत असे. सागरचा मित्र आणि शाहरुख खानचा डुप्लिकेट राजू रायकवार याने फोनवरून एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दोन जिम इन्स्ट्रक्टरने त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले होते. दुपारी 2.30 च्या सुमारास डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले. सागर हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी होते. तिथेच त्यांच्यावर अंत्यविधी केला जाणार आहे. 

Web Title: Sagar AKA Salman Pande | Salman Khan's body double dies of a heart attack during a workout at the gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.