यंदा राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटूंबाबरोबर झालं... प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:25 AM2022-09-06T11:25:38+5:302022-09-06T11:40:15+5:30
मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं.
मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मुंबईतील लालबागच्या राजावर अनेकांची श्रद्धा आहे. दोन वर्षानंतर यावर्षी पुन्हा एकदा राजाचं दर्शन भाविकांना घेता येतं आहे. हास्यजत्रेतील दमदार विनोदवीरांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने खरोखरच रसिकांच्या मनात घर केलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं. निवेदिका प्राजक्ता माळी, हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय आजही खुर्चीत खिळवून ठेवण्यास प्रेक्षकांना भाग पाडत आहेत.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कलाकारांनी लालबागच्या राजेचं दर्शन घेतलं यादरम्यानचे फोटो प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीने फोटो शेअर करताना लिहिले, आणि यावेळी राजाचं दर्शन हास्यजत्रेच्या कुटूंबाबरोबर झालं. २ वर्षांनी सण- उत्सवांचा आनंद मिळतोय.. सगळ उट्ट काढणार असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांची देवता असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाची अशीच आपल्या सगळ्यावर कृपादृष्टी राहो हीच सदिच्छा। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर आल्या आहेत.