सई ताम्हणकर चमकणार हॉलीवूडमध्ये

By Admin | Published: April 28, 2016 02:59 AM2016-04-28T02:59:21+5:302016-04-28T02:59:21+5:30

मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Sai Tamhankar shines in Hollywood | सई ताम्हणकर चमकणार हॉलीवूडमध्ये

सई ताम्हणकर चमकणार हॉलीवूडमध्ये

googlenewsNext

मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने दुनियादारी, तू ही रे, बालक पालक, प्यारवाली लव्हस्टोरी असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले आहे. यानंतर, या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्येदेखील ‘हंटर’ या चित्रपटाने पदार्पण केले. सईची ही यशस्वी वाटचाल येथेच न थांबता आता ती चक्क, हॉलिवूडमध्ये चमकणार आहे. येस, बसला ना आश्चर्याचा धक्का. पण हे खरं असल्याचे कळते. या हॉलिवूड चित्रपटाचे नाव लव्ह सोनिया असे आहे. यामध्ये स्लमडॉग मिलेनिअरफेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो, अनुपम खेर, पॉल डॅनो, मनोज वाजपेयी, अदिल हुसैन, राजकुमार राव आणि रिचा चढ्ढा अशा दिग्गज बॉलिवूड कलाकारांसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. स्लमडॉग मिलेनिअर चित्रपटाचे निर्माते तब्रेज नुरानी हेदेखील या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. सई ताम्हणकरने लव्ह सोनिया या टीमसोबत जेवतानाचा एक क्लिक सोशल मीडियावर शेअर केला आहे. असो, पण सईच्या या हॉलिवूड पदार्पणाने नक्कीच अभिमान वाटेल हे नक्की.

Web Title: Sai Tamhankar shines in Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.