'टशन'च्या आधी या चित्रपटाच्या दरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूरमध्ये वाढली होती जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:52 PM2021-03-31T17:52:37+5:302021-03-31T17:52:55+5:30

एकमेकांना डेट करण्याआधी करीना कपूर आणि सैफ अली खानने एकत्र एक दोन चित्रपटात काम केले होते.

Saif Ali Khan and Kareena Kapoor had grown close during the film before 'Tashan' | 'टशन'च्या आधी या चित्रपटाच्या दरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूरमध्ये वाढली होती जवळीक

'टशन'च्या आधी या चित्रपटाच्या दरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूरमध्ये वाढली होती जवळीक

googlenewsNext

एकमेकांना डेट करण्याआधी करीना कपूर आणि सैफ अली खानने एकत्र एक दोन चित्रपटात काम केले होते. सर्वांना माहित आहे की, टशन चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलू लागले आणि त्यांच्यातील जवळीकता लोकांना दिसू लागली होती. मात्र तुम्हाला माहित आहे का की, टशन चित्रपटाआधी आणखी एका चित्रपटात ते दोघे एकत्र दिसले होते. या चित्रपटाचे नाव आहे ओमकारा.


खरेतर ओमकारा चित्रपटात करीनाच्या अपोझिट अजय देवगण होता. मात्र या चित्रपटात सैफ अली खानने लंगडा त्यागीची भूमिका केली होती. या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते. या चित्रपटात सैफ आणि करीनाचे खूप कमी सीन होते. त्यामुळे त्यांचे शूट वेगवेगळे झाले होते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरीदेखील ते दोघे बऱ्याचदा एकत्र दिसतात. दोघे सेटवर तासांन तास वेळ व्यतित करायचे. एकमेकांशी खूप गप्पा मारायचे आणि एकमेकांच्या शूट संपण्याची वाट पाहायचे.


ओमकारा चित्रपटानंतर दोघांना टशन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा सैफ पूर्णपणे करीनावर लट्टू झाला होता. त्याला कळले होते की करीनावर त्याचे खूप प्रेम आहे आणि मग त्याने तिला प्रपोझ केले.

अखेर दोघे रिलेशनशीपमध्ये आले. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग, २०१२ साली ते दोघे लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नाला ८ वर्षे झाले आहेत आणि दोघे सुखी विवाहित जीवन जगत आहेत. आता सैफ आणि करीना दोन मुलांचे पालक आहेत.

Web Title: Saif Ali Khan and Kareena Kapoor had grown close during the film before 'Tashan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.