‘तो’ सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत वाईट किस..! सैफने सांगितला राणीसोबतच्या ‘किस’चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:11 PM2021-11-18T13:11:03+5:302021-11-18T13:12:07+5:30

VIDEO : होय, ‘हम तुम’ या चित्रपटातील किसींग सीनचा किस्सा सध्या व्हायरल होतोय.

Saif Ali Khan calls kiss with Rani Mukerji in Hum Tum ‘worst kiss in the history of cinema’ | ‘तो’ सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत वाईट किस..! सैफने सांगितला राणीसोबतच्या ‘किस’चा किस्सा

‘तो’ सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत वाईट किस..! सैफने सांगितला राणीसोबतच्या ‘किस’चा किस्सा

googlenewsNext

अभिनेता सैफ अली खान  (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री राणी मुखर्जीचा  (Rani Mukerji) ‘बंटी और बबली 2’  (Bunty and Babli 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी ही जोडी कोणत्या चित्रपटात दिसली होती आठवतेय? तर ‘हम तुम’,‘थोडा प्यार, थोडा मॅजिक’. यापैकी ‘हम तुम’ हा सैफ व राणीच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. यासाठी सैफला नॅशनल अवार्डही मिळाला होता.  2004 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा आठवण्याचं कारण काय तर, यातील किसींग सीन.
होय, ‘हम तुम’ या चित्रपटातील किसींग सीनचा किस्सा सध्या व्हायरल होतोय. ‘हम तुम’मधील सैफ आणि राणीचा हा किसींग सीन चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात वाईट किसींग सीन होता. अर्थात हे आमचं नाही तर सैफचं स्वत:चं मत.
राणी व सैफ एका व्हिडीओमध्ये ‘हम तुम’च्या किसींग सीनबद्दल बोलताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये राणी सैफला विचारते, ‘तो किसिंग सीन करताना आपण दोघंही किती घाबरलो होतो, तुला आठवतंय का?’ त्यावर ‘तू तो सीन शूट करण्यासाठी किती घाबरलेली होती, हे मला चांगलंच आठवतंय,’ असं सैफ म्हणतो. पुढे तो म्हणतो, मला सगळं आठवतंय. तू सेटवर माझ्याशी अचानक खूप चांगली वागू लागली होती.   ही अचानक माझ्यासोबत इतकं चांगलं का वागतेय, हा प्रश्न मलाही पडला होता. मुळात तुला हा किसींग सीन करायचा नव्हता. मला हा किसिंग सीन करायचा नाही, हे तू दिग्दर्शकांना सांग, असं तुला माझ्यामार्फत दिग्दर्शकाला सांगायचं होतं. मी त्यावरून तुझी फिरकी घेतली होती.  माझा बॉस मला जे करायला सांगेल, ते मी करेन. मी का नकार देऊ? असं मी म्हणालो होतो. अखेर तू या किसींग सीनसाठी तयार झाली. पण मला विचारशील तर तो सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत वाईट किस होता. कारण तू संकोचल्यासारखं वागत होती. म्हणून मलासुद्धा संकोचल्यासारखं झालं होतं.
 या व्हिडीओमध्ये सैफ आणि राणीने त्यांच्या मैत्रीचेही किस्से सांगितले. ‘गेल्या 17 वर्षांत आपल्या दोघांच्या गप्पांचेही विषय बदलले आहेत. आता आपण आपली मुलं, आदिरा, तैमुर यांच्याविषयीच जास्त बोलतो,’ असं राणी म्हणाली.

Web Title: Saif Ali Khan calls kiss with Rani Mukerji in Hum Tum ‘worst kiss in the history of cinema’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.