'देवरा'च्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान झाला होता नर्व्हस, म्हणाला - "आणि मला घाम फुटला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:04 AM2024-09-14T11:04:45+5:302024-09-14T11:05:29+5:30

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याने शूटिंगचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

Saif Ali Khan Gets Nervous During 'Devara' Shoot, Says - "And I started sweating..." | 'देवरा'च्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान झाला होता नर्व्हस, म्हणाला - "आणि मला घाम फुटला..."

'देवरा'च्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान झाला होता नर्व्हस, म्हणाला - "आणि मला घाम फुटला..."

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) 'देवरा' (Devara Movie) चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत प्रवेश करणार आहे. या चित्रपटात ती ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, अभिनेत्याने साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा आपला अनुभव शेअर केला आणि चित्रपटाच्या शूटिंगची एक रंजक गोष्ट सांगितली. खरेतर नुकताच ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानच्या 'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेलर लाँचच्या दिवशी सैफ अली खानने चित्रपटात काम करतानाचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, मला आठवतं की पहिल्याच शॉटमध्ये मला तेलुगू बोलायचं होतं आणि मला घाम फुटला होता. त्यावेळी मला खूप अस्वस्थ वाटले.

सैफ पुढे म्हणाला, 'आम्ही एकाच देशातून आलो आहोत, पण आमची राज्ये एकमेकांपासून वेगळी आहेत. त्यामुळे तिथे काम करण्याचा अनुभव खूप वेगळा होता. पण एनटीआरने मला खूप सांभाळून घेतले.'' त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, हे सर्व घडले कारण कदाचित तारक आणि शिवला मला या भूमिकेत पाहायचे होते. कदाचित त्यांनी माझा ओंकारा सिनेमा पाहिला असेल.


यादरम्यान सैफने असेही सांगितले की चित्रपटात त्याच्या भूमिकेचे दोन व्हर्जन आहेत. एक तरुण आणि एक वृद्ध. यासाठी त्याचा मेकअपही खूपच क्रेझी होता. यापूर्वी सैफ अली खान 'आदिपुरुष' चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रभास आणि क्रिती सनॉन दिसली होते. सैफ अली खान, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांचा हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.

Web Title: Saif Ali Khan Gets Nervous During 'Devara' Shoot, Says - "And I started sweating..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.