अरेरे, हे काय? सैफ अली खान चक्क पत्नी करिनालाच विसरला...; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:30 PM2022-12-05T17:30:20+5:302022-12-05T17:30:47+5:30
Saif Ali Khan, Kareena Kapoor : सैफ अली खान व करिना कपूर खान दोघं सोबत दिसले रे दिसले की कॅमेरे त्यांच्याकडे वळतात. पण अलीकडे असं काही झालं की, सैफ चक्क करिनालाच विसरला...
सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर खान ( Kareena Kapoor) हे बॉलिवूडची लोकप्रिय जोडपं. या ना त्या कारणाने हे कपल सतत चर्चेत असतं. दोघं सोबत दिसले रे दिसले की कॅमेरे त्यांच्याकडे वळतात. पण अलीकडे असं काही झालं की, सैफ चक्क करिनालाच विसरला. आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेऊ या...
तर करिना व सैफने अलीकडे सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यादरम्यान सैफ व करिना दोघांनीही मीडियाशी संवादही साधला. यावेळी सैफनं त्याच्या आवडत्या अभिनेत्रींची नावं सांगितली. पण यावेळी बायकोचं नाव घ्यायला मात्र तो नेमका विसरला. मग काय? बेबोनं नेमक्या क्षणी त्याला आठवण करून दिली.
Saif and Kareena interview with @hiamag on #RedSeaIFF22 red carpet pic.twitter.com/SZ9bh3PVBk
— Kareena Kapoor Khan FC (@KareenaUpdates) December 3, 2022
सिनेमातील महिलांचं योगदान या विषयावर सैफला प्रश्न विचारण्यात आला. यावर सैफ भरभरून बोलला. सिनेमा महिलांशिवाय अपूर्ण आहे. सिनेमाबद्दल विचार केल्यावर अनेक अभिनेत्रींची नावं डोक्यात येतात. मार्लेन डायट्रिच पासून आड्री हेपबर्न ते चार्लीज थेरॉर पर्यंत अनेकजणी..., असं तो म्हणाला. नेमक्या याचक्षणी करिनाने त्याला टोकलं आणि तिच्या नावाची आठवण करून दिली. त्यानंतर सैफ हसला आणि करीनाचं नाव घेतलं. सैफिनाच्या हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
More pictures of Kareena and Saif from #RedSeaIFF22#RedSeaInternationalFilmFestivalpic.twitter.com/UeJcXLxHsn
— Kareena Kapoor Khan FC (@KareenaUpdates) December 2, 2022
यावेळी सैफ त्याची आई शर्मिला टागोर यांच्याबद्दलही बोलला. माझ्या आईचा पहिला सिनेमा ‘आपूर संसार’ दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासोबत होता. त्यावेळी माझ्या आईचं वय हे 16 वर्षे होतं. संपूर्ण जगातून वेग-वेगळ्या स्त्रीया या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी आल्या आहेत आणि या गोष्टीला सेलिब्रेट करायला हवं की महिला आता सगळं काही सांभाळत आहेत आणि फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात.