'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवादच्या जागी सैफ?

By Admin | Published: October 10, 2016 11:54 PM2016-10-10T23:54:14+5:302016-10-10T23:54:14+5:30

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची भूमिका असल्याने अडचणीत सापडलेल्या ऐ दिल है मुश्किलमध्ये फवाद खानने साकारलेली भूमिका सैफ अली खान करणार असल्याचे वृत्त आहे.

Saif in place of 'Aye Dil Hai' | 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवादच्या जागी सैफ?

'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवादच्या जागी सैफ?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची भूमिका असल्याने अडचणीत सापडलेल्या ऐ दिल है मुश्किलमध्ये फवाद खानने साकारलेली भूमिका सैफ अली खान करणार असल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाया वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे. 
 
मनसे, शिवसेना या पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून त्यांना मायदेशात परत पाठवण्याची आग्रही भूमिका घेतल्यानंतर फवाद खान व इतर मंडळी पाकिस्तानात परतली आहेत. पण ऐ दिल है मुश्किल मध्ये फवाद खानची भुमिका असल्यामुळे चित्रपट तिकिटबारीवर प्रदर्शित होऊ देणार नाही असा पवित्रा मनसेने घेतल्यानंतर दिगर्दशक करन जोहरने यावर तोडगा काढला आहे. 
 
मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे चित्रपटाला मोठा फटका बसू शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे. यामुळेच दिग्दर्शक करण जोहर याला फवादने साकारलेली भूमिका सैफने करावी असे वाटू लागले आहे.यामुळे आतापर्यंत ट्रेलरमध्ये व या चित्रपटाच्या गाण्यात दिसलेला फवादचा चेहरा चित्रपटातून गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धर्मा प्रोडक्शनचा ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट 28 ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. 
 
मात्र प्रदर्शनाला केवळ काही दिवस उरले असताना हे कसे शक्य होणार याचाही विचार सुरू आहे. यासाठी ग्राफिक्सची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात यश मिळाले नाही तर नव्याने काही सिन्स शूट करावे लागणार असून यामुळे चित्रपटाची प्रदर्शिनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. 
 
फवाद खान याने आपण मागील जुलै महिन्यापासून पाकिस्तानात असल्याचे फेसबुक पोस्ट करून सांगितले होते. भारतातील वातावरण पाहता तो पुन्हा भारतात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी उत्सुक असेल वाटत नाही. दुसरीकडे शाहरुखच्या रईसमध्ये माहिरा खान हिची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे रईस अडचणीत सापडला आहे.

Web Title: Saif in place of 'Aye Dil Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.