'बाबा, थांब ना रे तू...' ; सायली संजीवच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 11:33 AM2021-12-04T11:33:37+5:302021-12-04T11:34:18+5:30

सायली संजीवच्या वडिलांचे ३० नोव्हेंबरला निधन झाले असून आता तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Saily Sanjeev's father dies; She wrote emotional post 'Baba, don't stop, Baba, don't go away ..' | 'बाबा, थांब ना रे तू...' ; सायली संजीवच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

'बाबा, थांब ना रे तू...' ; सायली संजीवच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीववर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायलीच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. तिच्या वडिलांचे नाव संजीव असून त्यांचे ३० नोव्हेंबर, २०२१ ला निधन झाले आहे. 

सायली संजीवने इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले की, संजीव २६/०७/१९५८ - ३०/११/२०२१. तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल.. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं.
तिने पुढे लिहिले की, दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू.. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्या साठी कारे सारा खर्च केला तू..
आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा..बाबा, थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर…. 
सायली संजीवच्या या पोस्टवर सेलिब्रेटींसोबत चाहते श्रद्धांजली वाहत आहेत आणि तिला काळजी घे, असे सांगत आहेत.


सायली संजीवचा नुकताच झिम्मा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात सायलीने कृतिकाची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत या चित्रपटात क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, मृण्मयी गोडबोले आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Saily Sanjeev's father dies; She wrote emotional post 'Baba, don't stop, Baba, don't go away ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.