यावर्षी नाही साजरा होणार दिलीप कुमार यांचा वाढदिवस, सायरा बानो म्हणाल्या, आमच्यासाठी ही कठीण वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 03:38 PM2020-12-11T15:38:43+5:302020-12-11T16:34:50+5:30
अलीकडेच दिलीप कुमार आजारी असल्याची बातमी आली होती.
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी सायरो बानो दरवर्षी एक शानदार पार्टी देतात. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमुळे आणि त्याच्या दोन भावांच्या निधनामुळे यावर्षी कोणतीच पार्टी होणार नाही आहे. दिलीप कुमार आज (11 डिसेंबर ) 98 वर्षांचा झाले.
अलीकडेच दिलीप कुमार आजारी असल्याची बातमी आली होती. सायरा बानो यांनी चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगितले होते. कोरोना संक्रमणामुळे याच वर्षात दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे दिलीपकुमार यांचा वाढदिवस यावर्षी साजरा होणार नाही .मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सायरा म्हणाल्या, "आमचे हे वर्ष खूप वाईट गेले." दिलीप साहेबांनी दोन भाऊ गमावले. त्यांची तब्येतही ठीक नाही आणि माझाही नाही. आमच्यासाठी ही कठीण वेळ आहे, म्हणून यावर्षी पार्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही फक्त जीवन आणि आरोग्यासाठी देवाचे आभार मानू.यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी लग्नाचा वाढदिवस ही साजरा (11 ऑक्टोबर) साजरा केला नाही.