Lock Upp: '...म्हणून तू गे आहेस'; साईशा शिंदेसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची लोकांनी उडवली होती खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:50 PM2022-04-26T18:50:00+5:302022-04-26T19:12:16+5:30
saisha shinde: आतापर्यंत साईशा शिंदेने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मात्र, यावेळी तिने सांगितलेल्या प्रकरणामुळे उपस्थित सगळेच जण थक्क झाले.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा Lock Upp हा कॉन्ट्रोवर्शिअल शो सध्या चांगलाच चक्चेत आहे. दर आठवड्याला या शोमधील स्पर्धकांना त्यांच्या जीवनातील एखादं सत्य उघड करायचं असतं. यामध्ये आतापर्यंत साईशा शिंदेने (saisha shinde) अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मात्र, यावेळी तिने सांगितलेल्या प्रकरणामुळे उपस्थित सगळेच जण थक्क झाले.
अलिकडेच साईशाला वाचवणऱ्यासाठी मुनव्वर फारुकीने तिच्या जीवनातील एक धक्कादायक प्रसंग सांगितला. हा किस्सा ऐकल्यावर सायशानेदेखील तिला बालपणी आलेल्या कटून अनुभवांचं कथन केलं. यात तिला कशाप्रकारे लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला हे तिने सांगितलं.
काय म्हणाली साईशा?
"हे माझं पहिलं खूप मोठं सिक्रेट आहे. तुमच्या दोघांचं ( मुनव्वर आणि कंगना) ऐकल्यावर मी ही गोष्ट उघड करते. ज्याप्रमाणे मुनव्वरला बालपणात काही कटू अनुभवांना सामोरं जावं लागलं, तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत घडला. त्या वाईट आठवणी पुन्हा माझ्या डोळ्यासमोर आल्या. हे सिक्रेट मी फार मोजक्या लोकांनाच सांगितलं आहे", असं साईशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी माझ्याविषयी जितक्या लोकांना सांगितलं त्यांनी मलाच ट्रोल केलं. अच्छा म्हणून तुला शरीरसंबंध आवडतात. म्हणूनच तू गे आहेस, असं म्हणून खिल्ली उडवत माझी अवहेलना करण्यात आली. त्यामुळे तेव्हापासून माझ्याविषयीचं सत्य मी कधीच कोणाला सांगितलं नाही. ही गोष्ट फक्त माझ्यापर्यंतच मी मर्यादित ठेवली."
दरम्यान, साईशाने आतापर्यंत तिच्या पर्सनल लाइफविषयी आणि ट्रान्सजेंडर समाजाविषयी, त्यांच्या अडचणींविषयी अनेकदा भाष्य केलं आहे. त्यामुळे या शोमध्ये साईशा कायम चर्चेत असलेली स्पर्धक म्हणून ओळखली जाते. साईशा बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. आतापर्यंत तिने करीना कपूर खान, सनी लिओनी, भूमी पेडनेकर, हिना खान आणि माधुरी दीक्षित, हरनाज संधू या लोकप्रिय सेलिब्रिटींचे कपडे डिझाइन केले आहेत.