सलमानला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही- फराह
By Admin | Published: August 18, 2016 04:32 AM2016-08-18T04:32:43+5:302016-08-18T04:32:43+5:30
को रिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खानने एका कार्यक्रमात मीडियावर चांगलेच तोंडसुख घेतले. एका कार्यक्रमात जेव्हा तिला विचारण्यात आले की, तू सलमानला पालक
को रिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खानने एका कार्यक्रमात मीडियावर चांगलेच तोंडसुख घेतले. एका कार्यक्रमात जेव्हा तिला विचारण्यात आले की, तू सलमानला पालक होण्यासंबंधी काय सल्ला देशील? तेव्हा तिने कडक शब्दांत सांगितले की, सलमान खूप हुशार आणि आपल्या सर्वांपेक्षा खूप यशस्वी आहे. त्यामुळे त्याला पालक होण्यासंबंधी किंवा मुलबाळांविषयी आपल्या सल्ल्याची गरज नाही. तो तेवढा समर्थ आहे. आता फराहचे असे सडेतोड उत्तर ऐकून उपस्थित सर्वच जण आश्चर्यचकित झाले. बॉलीवूड सेलिब्रिटिज्ना सल्लूमियांच्या लग्नाविषयी विचारल्यावर एवढा राग का येतो, हे काही कळण्यास मार्ग नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान
खानच्या लग्नाचा विषय सुरू आहे. या वर्षी तो अखेर तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी लग्न करणार असल्यामुळे तर याविषयीच्या
चर्चांना आणखी उधाण आलेले
आहे.