Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:19 PM2024-10-24T13:19:20+5:302024-10-24T13:20:11+5:30

Salman Khan : १९९८ ची ही केस आहे, जेव्हा सलमान त्याच्या 'हम साथ साथ है' चित्रपटातील सहकलाकारांसोबत शिकारीला गेला होता. 

Salman Khan blackbuck poaching case recalls how it all started he was petrified ate biscuits Lawrence Bishnoi | Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा

Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा

काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. याच कारणामुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अभिनेत्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी असंही काही लोकांनी म्हटलं आहे. १९९८ ची ही केस आहे, जेव्हा सलमान त्याच्या 'हम साथ साथ है' चित्रपटातील सहकलाकारांसोबत शिकारीला गेला होता. 

एका जुन्या मुलाखतीत सलमानने सांगितलं होतं की, शिकारीला जावं असं त्याच्या मनाला का वाटलं आणि या संपूर्ण घटनेची सुरुवात कशी झाली. छंद म्हणून सुरू झालेल्या या गोष्टीची आजही मोठी किंमत मोजावी लागत आहे. २००९ मध्ये एनडीटीव्हीशी बोलताना सलमानने स्वत: सांगितलं होतं की तो कधी, कुठे आणि कसा शिकारीला गेला होता. 

सलमानला त्यावेळी एक घाबरलेलं हरीण दिसलं होतं आणि तेव्हा त्याने त्याला बिस्किट खायला दिलं होतं. सलमान म्हणाला, "मला वाटलं की ते इथूनच आलं आहे. एके दिवशी पॅक-अप नंतर, गाडी चालवत होतो, आम्ही सर्वजण... सैफ, तब्बू, नीलम, अमृता, सोनाली तिथे होतो आणि आम्हाला एका झाडात हरीणाचं पाडस अडकलेलं दिसलं."

"संपूर्ण कळप तिथे होता, म्हणून मी गाडी थांबवली, पण तो घाबरला. आम्ही त्याला तिथून बाहेर काढलं आणि प्यायला पाणी दिलं. तो खूप घाबरला होता. थोड्यावेळाने आम्ही त्याला बिस्किट खायला दिलं आणि त्यानंतर तो पळून गेला. त्या दिवशी आम्ही आमचं लवकर पॅकअप केलं. आम्ही सगळे एकत्र जात होतो. मला वाटतं की हे सर्व तिथून सुरू झालं."

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी

 सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीला अटक करण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली होती. तसेच ५ कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. आता त्या व्यक्तीला जमशेदपूर येथून अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: Salman Khan blackbuck poaching case recalls how it all started he was petrified ate biscuits Lawrence Bishnoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.