सलमान खानच्या ‘भारत’मुळे पाकिस्तानला भरली धडकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:43 AM2019-02-18T10:43:12+5:302019-02-18T10:43:43+5:30

होय, सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’   ईदच्या मुहूर्तावर पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता. पण आता  सलमानच्या या चित्रपटाला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

salman khan film bharat not release in pakistan | सलमान खानच्या ‘भारत’मुळे पाकिस्तानला भरली धडकी!

सलमान खानच्या ‘भारत’मुळे पाकिस्तानला भरली धडकी!

googlenewsNext
ठळक मुद्दे पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाचे वातावरण आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध आता आणखीच बिघडले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानात रिलीज होणाºया चित्रपटांवरही पडला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता एक ताजी बातमी आहे. होय, सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’   ईदच्या मुहूर्तावर पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता. पण आता  सलमानच्या या चित्रपटाला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित न करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. याला कारण काय तर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान. होय, सलमानचा ‘भारत’   ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. याच मुहूर्तावर पाकिस्तानी बॉक्सआॅफिसवर फवाद खानचा ‘द लीजेंड आॅफ मौला जट्ट’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. ईदला सलमानचा ‘भारत’ प्रदर्शित झाला असता तर फवादच्या चित्रपटाला मोठे नुकसान सोसावे लागले असते. त्यामुळे सलमानला घाबरून पाकिस्तानने थेट ‘भारत’च्या प्रदर्शनावरचं बंदी लादली.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने एक पत्रक जारी केले होते. त्यानुसार, ईदच्या दोन दिवसांपूर्वी आणि यानंतर दोन आठवड्यांपर्यंत कुठलाही भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. याला कारण म्हणजे, पाकिस्तानात भारतीय चित्रपटांबद्दलचे आकर्षण. होय, पाकिस्तानी लोक पाकिस्तानी नाही तर भारतीय चित्रपटांचे चाहते आहेत. याचमुळे, भारतीय चित्रपट रिलीज झाला रे झाला की, पाकिस्तानी मेकर्सला धडकी भरते. यापूर्वी सलमानचा ‘रेस 3’ हा चित्रपटही पाकिस्तानात ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला नव्हता.
तूर्तास पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाचे वातावरण आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध आता आणखीच बिघडले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानात रिलीज होणा-या चित्रपटांवरही पडला आहे.

Web Title: salman khan film bharat not release in pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.