वाढदिवसापूर्वीच सलमान खानला पहाटे सर्पदंश; शूटिंग मध्येच सोडून पनवेलला का गेलेला?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:49 PM2021-12-26T12:49:36+5:302021-12-26T12:50:55+5:30

Salman Khan Snake Bite : अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री घडली.

Salman Khan gets snake bite snake non venomous an incident at a farm house in Panvel | वाढदिवसापूर्वीच सलमान खानला पहाटे सर्पदंश; शूटिंग मध्येच सोडून पनवेलला का गेलेला?

वाढदिवसापूर्वीच सलमान खानला पहाटे सर्पदंश; शूटिंग मध्येच सोडून पनवेलला का गेलेला?

googlenewsNext

वैभव गायकर

पनवेल : अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी रात्री घडली. पनवेल कामोठे येथील एमजीएम मध्ये दाखल करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील वाजेपूर याठिकाणी सलमान खानचे अर्पिता फार्म म्हणून फार्म हाऊस आहे. याठिकाणी ही घटना घडली. साप बिनविषारी असल्याने प्राथमिक उपचार करून सलमान खानला एमजीएममधून सोडून देण्यात आले.

शनिवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास सलमान खानला एमजीएम रुग्णालय कामोठे याठिकाणी दाखल करण्यात आले होते. यावेळी सलमानला प्राथमिक उपचार देण्यात आले. यावेळी एमजीएमचे डॉक्टर सलमानवर लक्ष ठेवून होते. सकाळी ९ च्या सुमारास सलमान खानला सोडून देण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुधीर कदम यांनी दिली. सलमान एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय पथक यांच्यासोबत त्याच्या पनवेल मधील वाजेपूर येथील अर्पिता फार्म याठिकाणी थांबले आहे. यावेळी एक सर्व सोयी सुविधायुक्त ऍम्ब्युलन्स देखील एमजीएम रुग्णालयाच्यावतीने फार्म वर ठेवण्यात आली असल्याची माहिती डॉ कदम यांनी दिली आहे.

ख्रिसमस ,नववर्षाच्या सेलिब्रशनासाठी सलमान पनवेलमध्ये 
सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस अथवा इतर घरगुती कार्यक्रम पनवेल येथील अर्पिता फार्मवर साजरा करीत असतो. यावेळी देखील ख्रिसमस, नववर्षाच्या सेलिब्रशनासाठी सलमान पनवेलमध्ये दाखल झाला होता. या परिसराच्या नजीक जंगल असल्याने याठिकाणी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळतात. 

Web Title: Salman Khan gets snake bite snake non venomous an incident at a farm house in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.