सलमानने नाकारली ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका; अफेअरच्या नादात गमावला सुपरहिट सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 03:00 PM2023-11-15T15:00:57+5:302023-11-15T15:01:48+5:30
Salman khan: 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्याचं सूत जुळलं होतं. त्याच काळात सलमानला एका सिनेमाची ऑफर मिळाली.
बॉलिवूडमध्ये आज असंख्य कलाकारांची रेलचेल पाहायला मिळते. त्यामुळे या सेलिब्रिटींची प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ कायम चर्चेत येत असते. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये कलाकारांचे अनेक रंजक किस्से ऐकायला मिळतात. सध्या सलमान खान ( salman khan) आणि ऐश्वर्या राय (aishwarya rai) यांचा एक किस्सा चर्चेत आला आहे. सलमानला एका सुपरहिट सिनेमा ऑफर झाला होता. परंतु, त्यात केवळ ऐश्वर्याच्या भावाची भूमिका साकारायची होती या एका कारणामुळे त्याने हा सिनेमा धुडकावून लावला.
'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या यांच्या यांचं सूत जुळलं. त्यामुळे ऑनस्क्रीन सोबतच त्यांची ऑफस्क्रीन जोडीही खूप लोकप्रिय झाली. त्यामुळेच या जोडीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु, यात एक सिनेमा असा होता ज्यात सलमानला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका ऑफर झाली होती. परंतु, त्याने हा सिनेमा करण्यास नकार दिला. सलमानच्या नकारामुळे हा सिनेमा अभिनेता शाहरुख खानला मिळाला. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने स्वत: याविषयी खुलासा केला.
'हम दिल दे चुके सनम'नंतर अवघ्या २ वर्षांमध्येच या जोडीचे रस्ते वेगळे झाले. या दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. त्याच काळात सलमानला 'जोश' सिनेमाची ऑफर मिळाली. या सिनेमात शाहरुख झळकला आहे. परंतु, प्रथम ती भूमिका सलमानला मिळाली होती. "जोशमध्ये शाहरुखपूर्वी सलमानला कास्ट करणार होते. माझ्या भावाची भूमिका त्याला ऑफर झाली होती. 'देवदास'मध्ये आम्ही कपल होतो (शाहरुख खान) तर जोशमध्ये भाऊ-बहीण पण यामुळे मला काहीच फरक पडत नव्हता. कारण, मला मन्सूर खानसोबत काम करायचं होतं. मला या सिनेमातला माझा रोल आवडला होता. कारण, तो माझ्या इतर भूमिकांपेक्षा वेगळा होता", असं ऐश्वर्या म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''सुरुवातीला शाहरुखच्या भूमिकेसाठी सलमान आणि चंद्रचूड सिंहच्या रोलसाठी आमिर खानच्या नावाचा विचार सुरु होता. मग नंतर कळलं की, शाहरुख आणि चंद्रचूड या सिनेमात आहेत. स्टारकास्ट बदलली होती. नवीन कलाकार माझ्यासोबत स्क्रीन शेअर करणार होते हे ऐकून मला काही फारसं वाटलं नाही. मी भूमिका करायला तयार होते."
दरम्यान, ज्यावेळी सलमानला जोश ऑफर झाला त्यावेळी सलमान-ऐश्वर्या एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे पडद्यावर बहीण-भावाची भूमिका करणं त्यांना योग्य वाटत नव्हतं.