तर आज शाहरुख नव्हे तर सलमान असता मन्नतचा मालक, काय आहे किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:23 PM2024-05-01T12:23:34+5:302024-05-01T12:25:56+5:30
सलमान खान हा बॉलिवूडचा 'भाईजान' तर शाहरुख खान बॉलिवूडचा 'बादशाह' म्हणून ओळखला जातो.
सलमान खान हा बॉलिवूडचा 'भाईजान' तर शाहरुख खानबॉलिवूडचा 'बादशाह' म्हणून ओळखला जातो. दोन्ही स्टार्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. शाहरुख खान हा मन्नत या आलिशान बंगल्यामध्ये राहतो. तर सलमान खान हा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. तुम्हाला माहित आहे का शाहरुख नव्हे तर सलमान खानला मन्नत या बंगल्याची ऑफर आली होती. पण एका कारणाने दबंग खानने नाकारली होती. तर तो किस्सा आपण जाणून घेऊया.
शाहरुखचं घर मन्नत एखाद्या टूरिस्ट स्पॉटपेक्षा कमी नाही, अनेकजण त्याच्या बंगल्याची एक झलक पाहण्यासाठी येत असतात. पण शाहरुखचा हा बंगला सलमान खान खरेदी करणार होता. याचा खुलासा खुद्द भाईजानने एका मुलाखतीत केला होता. एका मुलाखतीत सलमानला विचारण्यात आले की, शाहरुखकडे कोणत्या गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे नाही. याला उत्तर देताना भाईजानने 'मन्नत बंगला' असं म्हटलं होतं.
यानंतर भाईजानने खुलासा केला होता की, शाहरुख खानच्या आधी त्याला मन्नतला खरेदी करण्याची ऑफर आली होती. मात्र वडील सलीम खान यांनी एवढा मोठा बंगला घेण्यास नकार दिला होता. एवढ्या मोठ्या बंगल्याचा काही उपयोग नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. वडील सलीम यांनी हा सौदा होऊ दिला नव्हता. त्यांच्या सांगण्यावरुन सलमानने मन्नत हा बंगला खरेदी केला नव्हता.
सलमान खानने हा बंगला खरेदी करण्यास नकार दिल्यानंतर शाहरुख खानने मन्नत खरेदी केला. शाहरुख खानचा मन्नत बंगला 27 हजार स्क्वेअर फुटांमध्ये बांधण्यात आला आहे. आधी याचं नाव विला विएना असं होतं. नरीमन दुबाश यांच्याकडे याची मालकी होती. शाहरुख खानने 2001 मध्ये बाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून 13.32 कोटींना हा बंगला खरेदी केला होता.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी झळकले होते. आता पुढच्या वर्षी ईदला सलमान नवा चित्रपट घेऊन येत आहे. अलीकडेच सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.