वरुण धवनच्या 'बेबी जॉन' मध्ये सलमान खानचा कॅमिओ; म्हणाला, "अनेक महिने त्याचा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:44 PM2024-11-12T13:44:42+5:302024-11-12T13:45:54+5:30
वरुणसाठी हा सिनेमा करिअरच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे.
वरुण धवनचं (Varun Dhawan) सध्या नशीब जोरावर आहे. नुकतीच त्याची 'सिटाडेल हनी बनी' सीरिज रिलीज झाली. यात त्याचे दमदार अॅक्शन सीन्स आहेत. तसंच लवकरच त्याचा 'बेबी जॉन' (Baby John) सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अॅटलीने सिनेमाची निर्मिती केली आहे. वरुणसाठी हा सिनेमा करिअरच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. दरम्यान 'बेबी जॉन' सलमान खानचाही शानदार कॅमिओ असणार आहे. त्यामुळे सिनेमाची चर्चा आणखी वाढली आहे.
वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. यातही त्याचे जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. आता सलमान खानही सिनेमात कॅमिओ करणार असल्याची गुडन्यूज आली आहे. यामुळे चाहते आणखी आतुर झाले आहेत. सलमान खानच्या कॅमिओबाबत वरुण धवनला ट्विटरवर एका चाहत्याने प्रश्न विचारला. 'बेबी जॉनमध्ये भाईजानचा कॅमिओ किती मिनिटांचा असेल?' असं चाहत्याने विचारलं. यावर वरुण रिप्लाय देत म्हणाला, "किती मिनिटांचा असेल हे तर सांगणार नाही. पण नक्कीच अनेक महिने या कॅमिओचा प्रभाव राहील एवढं सांगेन. "
Minutes Nahi bolunga impact bahut zyaada kaafi mahino ka milega #babyjohn#varunsayshttps://t.co/J3T4RFtPDh
— VarunDhawan (@Varun_dvn) November 11, 2024
वरुण धवनच्या या रिप्लायवरुन सलमान खानचा कॅमिओ असणार हे तर स्पष्ट झाले आहे. या सिनेमात वरुण धवनसोबत कीर्ती सुरेश असणार आहे. कीर्ती नवरीच्या वेशात दिसत आहे. यावरुन ती वरुणची पत्नी असल्याचा अंदाज आहे. तर जॅकी श्रॉफ सिनेमात खलनायक आहे. २५ डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.