"तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी डान्स करेन...", अनंत-राधिकासाठी सलमानची हटके पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 08:53 AM2024-07-16T08:53:39+5:302024-07-16T08:54:11+5:30
बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेदेखील अनंत-राधिकासाठी पोस्ट लिहिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन अनंत-राधिकाच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : गेले काही दिवस जिकडेतिकडे फक्त एका लग्नाची चर्चा होताना दिसत आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला पार पडला. या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. अनेक सेलिब्रिटींनी लग्नानंतर खास पोस्ट करत अनंत-राधिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेदेखील अनंत-राधिकासाठी पोस्ट लिहिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन अनंत-राधिकाच्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने खास कॅप्शन दिलं आहे. "अनंत आणि राधिका, मि. अँड मिसेस अनंत अंबानी...तुमचं एकमेकांवर आणि एकमेकांच्या कुटुंबासाठी असलेलं प्रेम मी पाहिलं आहे. युनिव्हर्सने तुम्हाला एकत्र आणलेलं आहे. तुम्हाला सुदृढ आणि आनंदी आयुष्य लाभो. तुम्ही आईबाबा व्हाल तेव्हा मी डान्स करेन", असं सलमानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
"तू कधी लग्न करणार?" असा प्रश्न चाहते भाईजानला विचारत आहेत. "तुमच्यासाठी अशा पोस्ट कधी करणार लोक?", "आम्ही मि. अँड मिसेस सल्लूची वाट पाहत आहोत" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडसह या वेडिंग सोहळ्याला हॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर अनंत-राधिकाचं वेडिंग रिसेप्शन आणि आशीर्वाद सेरेमनीही ठेवण्यात आली होती.