जोधपूर पोलिस स्टेशनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, सलमान खानला त्याच्या वागणुकीचा पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:43 AM2024-11-26T09:43:09+5:302024-11-26T09:43:36+5:30
सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा दबंग खान सलमान हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जवळपास २० वर्षांपूर्वीचा आहे. जेव्हा काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आता खुद्द सलमान खान याने त्या व्हिडीओसंदर्भात भाष्य केलं आहे. त्यावेळी केलेल्या वागणुकीचा पश्चाताप होतो, असं त्यानं म्हटलं आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओत सलमान खान हा तो वनविभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी आलेला दिसतोय. पण त्याच्या चेहऱ्यावर एक अंहकार आणि ना भीती आहे ना कसली चिंता दिसतेय. तो अगदी बिनधास्तपणे अधिकाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओचा उल्लेख सलमान खान याने 'बिग बॉस 18'च्या 'विकेंड का वार'मध्ये स्पर्धक रजत दलाल याच्याशी बोलताना केला. पोलिस ठाण्यात जे काही केलं, माझी वागणूक योग्य योग्य नसल्याचे सलमानने म्हटले.
जुन्या व्हिडिओंबद्दल बोलताना सलमान म्हणाला- 'जर तुम्ही माझ्या जुन्या क्लिप पाहिल्या असतील, तर तुम्हाला असे वाटेल की सलमान खान किती उद्धटपणे पोलिस स्टेशनमध्ये बसला आहे. पण माझा त्या प्रकरणात काही चूक नव्हती. मग मी तिथे जायला का घाबरू? असं मला वाटतं होतं. पण, आता जेव्हा मी मागे वळून पाहितो, तर कळतं की काळवीट शिकार प्रकरणात सहभागी नसतानाही मी गणवेशाचा आदर करायला हवा होता. कारण, जेव्हा एखादा अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्ती येते, तेव्हा तुम्ही उभे राहून त्यांच्या आदर करायला हवा. आज जेव्हा मी त्या जुन्या क्लिप्स बघतो तेव्हा मला त्या घटनेबद्दलच काही चांगलं वाटत नाही. आता माझी चालण्याची एक पद्धत आहे. एक देहबोली आहे, जी मी आता बदलू शकत नाही. त्यातून अंहकार झळकतो, असं लोकांना वाटतं".
This is MEGASTAR #SalmanKhan 🔥
— CineHub (@Its_CineHub) November 24, 2024
His THOUGHTS, VISION and PERSONALITY everything is INSPIRING! @BeingSalmanKhanpic.twitter.com/mbjGT87q2G
दरम्यान, 1998 मध्ये राजस्थानमध्ये हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सिनेमाचे कलाकार सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम कोठारी आणि सैफ अली खान हे सगळे बंदूक घेऊन निघाले आणि त्यांनी काळवीटाची शिकार केली. पण काळवीटाची शिकार करण्यावर बंदी आहे आणि बिश्नोई समाजात तर काळवीटाची पूजा केली जाते. त्यामुळं तिथलं वातावरण एकच तापलं होतं. याप्रकरणात सलमानचं नाव पहिल्यांदा समोर आलं. आणि या प्रकरणी पहिल्यांदाच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सलमानला चौकशीसाठी बोलावलं होतं. हे प्रकरण अनेक वर्षे कोर्टात होतं. सलमान तीन वेळा तुरुंगातही जाऊन आला. काही वर्षांपूर्वी या प्रकरणात त्याला दिलासा मिळाला. पण बिश्नोई समाज मात्र त्याच्या माफीची वाट बघतोय. माफी माग नाही तर जीव गमवावा लागेल, अशा धमक्या सलमानला सतत येत आहेत.