या अभिनेत्रीमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 08:00 AM2020-04-30T08:00:00+5:302020-04-30T08:00:00+5:30
सलमानने रणबीरला चार हात दूर ठेवणेच पसंत केले.
रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ. ब्रेकअपनंतरही सलमानने रणबीरला माफ केले नाही.
२०१९मध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर अॅवॉर्ड शो दरम्यान कॅट आणि रणबीरची भेट झाली. तसे पाहिला गेले तर रणबीर आणि कॅटरिना एकमेकांच्या समोरासमोर येण्याचे टाळत असतात. मात्र पहिल्यांदा फिल्मफेअरच्या निमित्ताने दोघांचा सामना झाला दोघांनी जुने वाद विसरुन गळाभेट घेतली. हे चित्र पाहुन दोघांमधील जुनं वाद विसरुन पुन्हा एकदा नव्याने मित्र झाल्याचे दिसतेय. मात्र कॅटरिनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान रणबीरवर अजूनही नाराज आहे.
सलमानची नाराजी लवकरच दूर होत नाही. सलमान खानच्या नाराजीचे किसे बी-टाऊनमध्ये देखील फेमस आहेत. एकदा ज्याने सलमानसोबत पंगा घेतला त्याला तो सहजासहजी माफ करत नाही. याच कारणामुळे कॅटरिनासोबत झालेल्या ब्रेकअपनंतरही सलमानने रणबीरला माफ केलेले नाही. 2016 पासून सलमानने रणबीरला चार हात दूर ठेवणेच पसंत केले.