'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर सलमान खान थेटच बोलला, म्हणाला, "१०० कोटी कमावणं मोठी गोष्ट नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 08:46 AM2023-09-22T08:46:42+5:302023-09-22T08:49:28+5:30

'गदर २' आणि 'जवान'च्या सक्सेसवर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

salman khan talk about jawan and gadar 2 success said now we have to set 1000cr benchmarkh for movie | 'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर सलमान खान थेटच बोलला, म्हणाला, "१०० कोटी कमावणं मोठी गोष्ट नाही..."

'जवान' आणि 'गदर २'च्या सक्सेसवर सलमान खान थेटच बोलला, म्हणाला, "१०० कोटी कमावणं मोठी गोष्ट नाही..."

googlenewsNext

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा डंका पाहायला मिळत आहे. 'पठाण', 'गदर २', 'ड्रीम गर्ल २', 'जवान' असे एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडला अच्छे दिन आले आहेत. 'गदर २' आणि 'जवान' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटांनी काही दिवसांतच ५०० कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. 

'गदर २' आणि जवानच्या सक्सेसवर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ईटाइम्सनुसार, सलमान खानने मौजा ही मौजा या पंजाबी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्याने 'गदर २' आणि जवानच्या सक्सेसवर भाष्य केलं. तो म्हणाला, "बॉलिवूड बरोबरच इतर इंडस्ट्रीमध्ये चित्रपट ज्याप्रकारे कमाई करत आहेत. त्यामुळे ते नवीन रेकॉर्ड सेट करत आहेत." 

"४००, ५००, ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई चित्रपट करत आहेत. मराठी चित्रपटही चांगली कमाई करत आहेत. मला वाटतं १०० कोटींची कमाई करणं मोठी गोष्ट नाही. आता चित्रपटांसाठी १००० कोटी हा बेंचमार्क असला पाहिजे," असंही पुढे सलमान खान म्हणाला.

दरम्यान, सलमान खान 'टायगर ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'टायगर ३'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाईजानच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

Web Title: salman khan talk about jawan and gadar 2 success said now we have to set 1000cr benchmarkh for movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.