'सिंघम ३'मध्ये दिसणार नाही सलमान खान, रोहित शेट्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:40 PM2024-09-23T17:40:07+5:302024-09-23T17:41:31+5:30

अजय देवगण(Ajay Devgan)च्या आगामी 'सिंघम ३' (Singham 3) या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) कॅमिओ करणार असल्याची चर्चा होती.

Salman Khan will not appear in 'Singham 3', no reaction from Rohit Shetty | 'सिंघम ३'मध्ये दिसणार नाही सलमान खान, रोहित शेट्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

'सिंघम ३'मध्ये दिसणार नाही सलमान खान, रोहित शेट्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

अजय देवगण(Ajay Devgan)च्या आगामी 'सिंघम ३' (Singham 3) या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) कॅमिओ करणार असल्याची चर्चा होती. 'दबंग' चित्रपटातील चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान त्यात एंट्री करणार असल्याचे बोलले जात होते. साऊथचा सुपरस्टार प्रभास या चित्रपटाचा भाग असेल अशीही चर्चा या चित्रपटाबाबत होती, पण हेही शक्य दिसत नाही.

प्रभासबाबत काही गोष्टी पूर्णपणे स्पष्ट नसल्या तरी ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, सलमान या चित्रपटाचा भाग असणार नाही. अद्याप या संदर्भात चित्रपट निर्माता रोहित शेट्टीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

‘सिंघम ३’ हा मल्टीस्टारर चित्रपट
अजय देवगण 'सिंघम ३'मध्ये डीसीपी बाजीराव सिंघमच्या भूमिकेत परतणार आहे. 'सूर्यवंशी' अक्षय कुमार आणि 'सिम्बा' रणवीर सिंग यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

'सिंघम ३'ची 'भूल भुलैया ३'शी होणार टक्कर
'सिंघम ३' हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, जिथे त्याची टक्कर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाशी होणार आहे, सध्या सलमान एआर मुरुगदाससोबत 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रश्मिका मंदाना पहिल्यांदाच सलमानसोबत दिसणार आहे.


 

Web Title: Salman Khan will not appear in 'Singham 3', no reaction from Rohit Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.