झरिनाने मानले सलमानचे आभार

By Admin | Published: August 30, 2015 11:36 PM2015-08-30T23:36:32+5:302015-08-30T23:36:32+5:30

आपला मुलगा आणि उदयोन्मुख अभिनेता सूरज पांचोलीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल अभिनेत्री झरिना वहाब यांनी सलमान खानचे आभार मानलेत. सुभाष घर्इंच्या

Salman's thanks to Zarina | झरिनाने मानले सलमानचे आभार

झरिनाने मानले सलमानचे आभार

googlenewsNext

आपला मुलगा आणि उदयोन्मुख अभिनेता सूरज पांचोलीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल अभिनेत्री झरिना वहाब यांनी सलमान खानचे आभार मानलेत. सुभाष घर्इंच्या गाजलेल्या ‘हीरो’ चित्रपटाचा रिमेक असलेल्या चित्रपटात सूरज नायक म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा सलमान सहनिर्माता आहे. सुनील शेट्टीची कन्या अथिया शेट्टीही या चित्रपटाची नायिका आहे. ‘‘मला खूप आनंद झालाय. अर्थातच याचं सर्व श्रेय सलमानला जातं. माझी आई नेहमीच सांगायची, की तुमच्या जीवनात एखादं संकट आलं, तर त्याबद्दल परमेश्वराला दूषणं देऊ नका. तो तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतोच. कुणाच्या तरी रूपात तो तुम्हाला मदत करतोच. तसंच आमच्या मदतीला सलमान धावून आलाय. सूरज आज जो काही आहे, तो सलमानमुळेच आहे. त्यामुळे मी सलमानची ऋणी आहे,’’ असं झरिना वहाब यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितलं. एका सिनेमासिकाच्या कव्हरवर सलमान आणि सूरजचं छायाचित्र आहे. त्याच्या अनावरणप्रसंगी झरिना बोलत होत्या. या कव्हरमध्ये सलमान व सूरज यात अतिशय आकर्षक दिसताहेत. त्या म्हणाल्या, की माझ्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणामुळे मला मनस्वी आनंद झालाय. सूरजनं आता मेहनतीनं यश मिळवावं. त्यासाठी माझ्या त्याला शुभेच्छा आहेत.

Web Title: Salman's thanks to Zarina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.