७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:00 PM2024-02-12T16:00:33+5:302024-02-12T16:01:07+5:30

गेल्या काही काळापासून समांथा सिनसृष्टीपासून दूर आहे. आता ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर आता समांथा पुन्हा कामाला लागणार आहे. 

samantha ruth prabhu all set to comeback after 7 months of break with health podcast | ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..."

७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..."

समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांत काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. पण, गेल्या काही काळापासून समांथा सिनसृष्टीपासून दूर आहे. प्रकृती आणि स्वत:कडे लक्ष देण्यासाठी समांथाने ब्रेक घेतल्याचं सांगितलं होतं. पण, आता तिने एक खुशखबर चाहत्यांना दिली आहे. ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर आता समांथा पुन्हा कामाला लागणार आहे. 

२०२२मध्ये समांथाला मायोसायटिस नावाचा आजार झाला होता. या आजावरील उपचारासाठी तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. त्याचदरम्यान समांथाचा यशोदा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सिटाडेट वेब सीरिजचं शूटिंग संपल्यानंतर समांथाने कामातून काही वेळ ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे गेले काही महिने तिने स्वत:वर लक्ष केंद्रित केलं होतं. पण, आता समांथा पुन्हा कामावर परतणार आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

समांथाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने कमबॅक करत असल्याचं सांगितलं. समांथा म्हणाली, "मी पुन्हा कामावर परतणार आहे. पण, मधल्या काळात मी जॉबलेस होते. मी हेल्थ पॉडकास्ट सुरू करणार आहे. हे अनपेक्षित असलं तरी मला हे करायला आवडतं आहे. तुमच्यापैकी अनेकांना याची मदत होईल." दरम्यान, 'यशोदा'नंतर समांथाचा 'शंकुतलम' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०२३मध्ये प्रदर्शित झालेल्या खुशी सिनेमात ती झळकली होती.  

Web Title: samantha ruth prabhu all set to comeback after 7 months of break with health podcast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.