'पुष्पा'मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये, तर सीक्वलसाठी श्रीलाला मिळाले फक्त इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:41 PM2024-11-14T12:41:04+5:302024-11-14T12:42:42+5:30
Pushpa 2 Item Song Fees: 'पुष्पा'मध्ये समांथा रुथ प्रभूने आयटम साँग केले होते. आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेत्री श्रीलाला आयटम साँग करताना दिसणार आहे.
अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या 'पुष्पा' (Pushpa) सिनेमाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. तर या चित्रपटाती 'ऊं अंटावा...' या आयटम साँगमधून समांथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)चा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. तिचे आयटम साँग खूपच चर्चेत आले होते. या गाण्यासाठी अभिनेत्रीने ५ कोटी रुपये मानधन घेतले होते. आता या चित्रपटाचा सीक्वल येत आहे. यात समांथाच्या जागी अभिनेत्री श्रीलीला (Shreeleela) आयटम साँग करताना दिसणार आहे.
'पुष्पा' चित्रपटाचे चाहते या चित्रपटाच्या सीक्वलची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात चित्रपटाच्या समोर येणाऱ्या अपडेटमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दरम्यान आता दुसऱ्या भागात समांथााच्या जागी श्रीलीला आयटम साँग करताना दिसणार असल्याचे समोर आले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, श्रीलीलाला या गाण्यासाठी २ कोटी मानधन मिळाले आहे. तिला समांथाच्या तुलनेत ६० टक्के कमी फी मिळाली आहे. श्रीलीला तिच्या मानधन आणि गाण्यामुळे खूप चर्चेत आहे.
श्रद्धा कपूरला आयटम साँगची मिळाली होती ऑफर
स्त्री फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला पुष्पाच्या सीक्वलमधील आयटम साँगसाठी विचारण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र तिने यासाठी ५ कोटी रुपये मानधन मागितले होते. याच कारणामुळे श्रद्धाच्या हातून हे डान्स नंबर निसटले आणि श्रीलीलाला फायनल करण्यात आले. निर्मात्यांच्या या निर्णयावर चाहत्यांची संमिश्र प्रतिक्रिया आहे. काही चाहते या कास्टिंगमुळे नाराज आहेत कारण इतर अभिनेत्रींच्या तुलनेत श्रीलीलाची लोकप्रियता कमी आहे. मात्र काही चाहते तिला या गाण्यात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
श्रीलीलाचे वर्कफ्रंट
श्रीलीला शेवटची गुंटूर कारम या सिनेमात पाहायला मिळाली होती. या चित्रपटासाठी तिने ४ कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. आता तिच्या हातात पुष्पा २ व्यतिरिक्त मास जथारा, रॉबिन हुड आणि उस्ताद भगत सिंग हे सिनेमा आहेत.